लक्ष द्या! आता Google Pay युजर्सना Rupay क्रेडिट कार्डने UPI करता येईल, बघा सोपी प्रोसेस

Updated on 24-May-2023
HIGHLIGHTS

भारतात Visa, Mastercard आणि Rupay सारखी डिजिटल कार्ड्स उपलब्ध

आता वापरकर्त्यांना त्यांचे रुपे क्रेडिट कार्ड Google Pay शी लिंक करता येईल.

आता क्रेडिटवरून पैसे घेऊन त्वरित पेमेंट करता येईल.

जर तुम्ही Google Pay युजर असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण Google Pay ने भारतात एक नवीन सेवा सादर केली आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते क्रेडिट कार्डने देखील UPI पेमेंट करण्यास सक्षम असतील. आतापर्यंत ही UPI पेमेंट सेवा फक्त डेबिट कार्डवर उपलब्ध होती. म्हणजे जेव्हा तुमच्या खात्यात पैसे होते, त्याच वेळी तुम्हाला UPI पेमेंट सर्व्हिसचा लाभ घेता येत होता. पण आता क्रेडिटवरून पैसे घेऊन त्वरित पेमेंट करता येईल. 

आता वरील प्रक्रिया करण्यासाठी काही वेगळे करावे लागेल का? ही प्रक्रिया अवघड असेल का? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील. हो ना… चला तर मग उत्तरे बघुयात – 

Rupay क्रेडिट कार्डधारकांसाठी सर्व्हिस

 भारतात Visa, Mastercard आणि Rupay सारखी डिजिटल कार्ड्स उपलब्ध आहेत. यापैकी व्हिसा आणि मास्टरकार्ड अमेरिकन कंपन्या आहेत, तर Rupay हे भारतीय पेमेंट कार्ड आहे. आता वापरकर्त्यांना त्यांचे रुपे क्रेडिट कार्ड Google Pay शी लिंक करता येईल. यानंतर जिथे RuPay क्रेडिट कार्ड स्वीकारले जाते, तिथे पेमेंट ऑनलाइन आणि ऑफलाइन करता येईल, अशी माहिती मिळाली आहे. 

Google Pay ला Rupay कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया

– सर्वप्रथम Google Pay ऍप ओपन करा. यानंतर तुम्हाला सेटिंग ऑप्शनवर जावे लागेल.

– त्यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय सेट करावा लागेल. 

– आता Add Rupay Credit Card पर्यायावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे 6 अंक तिथे भरा. यासोबतच एक्सपायरी डेट आणि पिन नंबर टाकावा लागेल.

– आता OTP व्हेरिफिकेशन करावे लागेल. 

– यानंतर तुम्ही सहज रूपे कार्डने पेमेंट करण्यास सक्षम असाल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :