NOKIA च्या फॅन्सी टॅबलेटमध्ये 8200mAh बॅटरी, नवीन इअरबड्स आणि पोर्टेबल स्पीकर देखील लाँच

Updated on 02-Sep-2022
HIGHLIGHTS

Nokia T21 टॅबलेट लाँच

नव्या टॅबलेटसह क्लॅरिटी इअरबड्स 2 प्रो आणि पोर्टेबल स्पीकर वायरलेस 2 देखील लाँच

नव्या टॅबलेटची किंमत सुमारे 10,300 रुपये

NOKIA ने आपला नवीन टॅबलेट Nokia T21 लाँच केला आहे. हा टॅबलेट 4GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये येतो. कंपनीने या टॅबलेटच्या Wi -Fi व्हेरियंटसह 4G/LTE व्हेरिएंट देखील लाँच केला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 129 युरो म्हणजेच सुमारे 10,300 रुपये आहे. टॅबलेट व्यतिरिक्त कंपनीने आज त्यांचे नवीन इअरबड्स  क्लॅरिटी इअरबड्स 2 प्रो आणि पोर्टेबल वायरलेस स्पीकर 2 देखील लाँच केले आहेत. 

हे सुद्धा वाचा : Airtel ने आणला वर्षभराचा जबरदस्त प्लॅन ! 5 रुपयांपेक्षा कमी दरात दररोज मिळतील अनेक बेनिफिट्स

Nokia T21 टॅबलेटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या टॅबमध्ये 2000×1200 पिक्सेल रिझोल्यूशनसह 10.4-इंच लांबीचा 2K डिस्प्ले आहे. डिस्प्ले 60Hz च्या रीफ्रेश रेट आणि 360 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. 4GB RAM आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह हा टॅब 12nm Unisoc Tiger T610 चिपसेटद्वारे समर्थित आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने टॅबची मेमरी 512 GB पर्यंत वाढवता येईल. 

फोटोग्राफीसाठी टॅबमध्ये कंपनी 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देत आहे, जो LED फ्लॅशसह येतो. सेल्फीसाठी टॅबमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी यामध्ये 8200mAh बॅटरी देत ​​आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

क्लॅरिटी इअरबड्स 2 प्रो

NOKIA चे हे बड्स हायब्रिड ऍक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचरसह येतात. याशिवाय, कंपनी त्यात ENC आणि AI स्पीच एन्हांसमेंट फीचर देखील देत आहे. यामध्ये डिव्‍हाइससोबत पेअर करण्‍यासाठी त्‍यामध्‍ये Quickly connect हे फिचर दिले आहे. त्याबरोबरच, यात 13 मिमी निओडीमियम ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.

नवीन बड्समध्ये कंपनी पॉवरफुल बॅटरीही देत ​​आहे. Hybrid ANC सुरु असताना ही बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर 28 तासांपर्यंत चालते. ANC शिवाय, पूर्ण चार्ज झाल्यावर या बड्स प्लेबॅक टाइम 9 तासांपर्यंत असतो. विशेष बाब म्हणजे बडमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे.

पोर्टेबल स्पीकर वायरलेस 2

कंपनी या पोर्टेबल स्पीकरमध्ये दमदार आवाजासाठी 45mm ड्रायव्हर्स देत आहे. ते 5 W च्या साउंड आउटपुटसह येतात. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.1 आहे. हा स्पीकर एका चार्जवर 22 तासांपर्यंत चालतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :