स्मार्टफोन ब्रँड Nokia ने गेल्या वर्षी Nokia T21 टॅबलेट जागतिक स्तरावर सादर केला होता. आता कंपनीने हा पॉवरफुल टॅबलेट भारतात लाँच केला आहे. या टॅबमध्ये 2K रिझोल्युशन असलेली मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय, नवीन डिव्हाइसला पावरफुल ड्युअल स्पीकरपासून ते 8,200mAh पर्यंतची मोठी बॅटरी मिळते. नोकियाच्या नवीन टॅबची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती घेऊया…
हे सुद्धा वाचा : OnePlus 11R मध्ये 50MP कॅमेरा, 16GB रॅमसह लवकरच होणार लाँच, जाणून घ्या सर्व काही
Nokia T21 टॅबलेटची किंमत 17,999 रुपये आहे. हे उपकरण ग्राहकांसाठी फक्त चारकोल ग्रे रंगात उपलब्ध आहे. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी केले जाऊ शकते.
नवीन नोकिया टॅबलेट 1200 x 2000 पिक्सेल, आस्पेक्ट रेशो 5:3 आणि पीक ब्राइटनेस 360 nits च्या रिझोल्यूशनसह 10.36-इंच LCD पॅनेलसह येतो. कंपनीच्या नवीन टॅबमध्ये LED फ्लॅशलाइटसह पुढील आणि मागील बाजूस 8MP कॅमेरा आहे.
चांगल्या कार्यक्षमतेसाठी, Nokia T21 ला 4GB RAM आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो मायक्रो SD कार्डच्या मदतीने वाढवता येतो. तर, हा टॅब Android 12 OS वर काम करतो. कंपनीचे म्हणणे आहे की, टॅबलेटला पुढील तीन वर्षांत सॉफ्टवेअर अपडेट मिळत राहतील.
नोकियाचा नवीन टॅबलेट 8,200mAh क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज आहे. हे 18W चार्जरने चार्ज केले जाऊ शकते. हा टॅब पूर्ण चार्ज करून तीन दिवस काम करतो, असा कंपनीचा दावा आहे. उत्तम आवाजासाठी यात ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत. याशिवाय, किड्स स्पेससह टॅबमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे स्पेसिफिकेशन्स उपलब्ध आहेत.