Nokia T10: नोकियाने लाँच केला परवडणारा टॅबलेट, स्टिरीओ स्पीकरसह मिळेल HD डिस्प्ले

Updated on 28-Sep-2022
HIGHLIGHTS

Nokia T10 परवडणारा टॅबलेट भारतात लाँच

Nokia T10 दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला

या टॅबलेटची किंमत 11,799 रुपये

Nokia एका मागे एक असे टॅबलेट भारतीय बाजारात लाँच करत आहे. आता कंपनीने आपला नवीन टॅबलेट Nokia T10 टॅबलेट भारतात लाँच केला आहे. हा टॅबलेट Android 12 सह सादर करण्यात आला आहे. टॅबलेटमध्ये 8-इंच लांबीचा HD डिस्प्ले आणि स्टिरीओ स्पीकरचा सपोर्ट आहे. नोकियाने यापूर्वी नोकिया T 21 भारतात लाँच  केला होता.

हे सुद्धा वाचा : Apple Store Diwali Offer : iPhone खरेदीवर मिळवा 7 हजार रुपयांची सूट, वाचा सविस्तर

नोकिया T10 टॅबलेटचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

टॅबलेटमध्ये 10.36-इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे, जो (1280X800 pixels) रिझोल्यूशनसह येतो. डिस्प्लेसह OZO प्लेबॅकसाठी देखील समर्थन आहे. हा टॅबलेट Android 12 वर चालतो आणि कंपनी दोन वर्षांसाठी Android अपडेट्स आणि तीन वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट्स देणार आहे. म्हणजेच, तुम्हाला Android 12 सोबत 13 आणि Android 14 देखील मिळू शकतात. 

नोकिया T10 टॅबलेटमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सपोर्ट करण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी AI फ्रंट कॅमेरा आहे. टॅबच्या कॅमेऱ्यासोबत LED फ्लॅशसाठी सपोर्टही देण्यात आला आहे. टॅब्लेटसह 5250mAh बॅटरी समर्थित आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, टॅबमध्ये स्टिरिओ स्पीकर, 3.5 मिमी जॅक आणि USB टाइप-C पोर्ट समर्थित आहेत.

UNISOC T606 प्रोसेसर यामध्ये उपलब्ध आहे. टॅबलेट 4 GB पर्यंत RAM सह 64 GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 GB पर्यंत वाढवता येईल.

Nokia T10 टॅबलेटची किंमत

Nokia T10 दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 3 GB रॅमसह 32 GB स्टोरेजची किंमत 11,799 रुपये आहे आणि 64 GB स्टोरेजसह 4 GB रॅमची किंमत 12,799 रुपये आहे. कंपनी लवकरच Nokia T10 (LTE + Wi-Fi) व्हेरिएंट लाँच करणार आहे. 

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :