भारीच की ! Nokia चा नवा टॅबलेट बाजारात लाँच, कमी किमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
Nokia चा नवा टॅबलेट Nokia T10 बाजारात लाँच
टॅबलेटच्या 3 GB RAM सह 32 GB स्टोरेज आणि Wi-Fi व्हेरिएंटची किंमत सुमारे 12,200 रुपये
तर Wi-Fi प्लस LTE व्हेरिएंटची किंमत सुमारे 14,000 रुपये
Nokia ने मंगळवारी आपला नवीन टॅबलेट Nokia T10 जागतिक स्तरावर लॉन्च केला. या टॅबलेटमध्ये 8-इंचाचा HD डिस्प्ले आहे. Nokia T10 5100mAh बॅटरी पॅक करते आणि 10W चार्जिंगला सपोर्ट करते. टॅबलेट Android Enterprise रिकमेंडेड आहे आणि Android 12 वर चालतो. यात तीन वर्षांचे मंथली सिक्युरिटी अपडेट देखील मिळतील.
हे सुद्धा वाचा : NOTHING PHONE 1 : जगातला पहिला ट्रान्सपरंट फोन लाँच, मागील पॅनलवर आकर्षक लाईट्स, किंमतही बजेटमध्ये
Nokia T10 ची किंमत
Nokia T10 टॅबलेट ओशन ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. पुढील महिन्यापासून हा टॅबलेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. Nokia T10 च्या 3 GB RAM सह 32 GB स्टोरेज आणि Wi-Fi व्हेरिएंटची किंमत सुमारे 12,200 रुपये आहे, तर Wi-Fi प्लस LTE व्हेरिएंटची किंमत सुमारे 14,000 रुपये आहे.
Nokia T10 स्पेसिफिकेशन्स
Nokia T10 हा कॉम्पॅक्ट टॅबलेट आहे. कंपनीचा दावा आहे की, हा टॅबलेट दमदार आणि मजबूत डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. त्याला IPX2 रेट केले गेले आहे. Nokia T10 मध्ये 8-इंच लांबीचा HD डिस्प्ले आणि Unisoc T606 प्रोसेसर आहे. टॅबलेटचे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512 GB पर्यंत वाढवता येते.
Nokia T10 च्या कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, यात ऑटोफोकस आणि फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, या टॅबलेटमध्ये 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग शूटर आहे. Nokia T10 फेस अनलॉक फीचरलाही सपोर्ट करतो.
Nokia T10 मध्ये 5100mAh बॅटरी आहे, जी 10W (5V / 2A) चार्जिंगला सपोर्ट करते. टॅबलेट ड्युअल बँड Wi-Fi (2.4 GHz आणि 5 GHz) आणि ब्लूटूथ v5.0 सह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी, Nokia T10 मध्ये 4G LTE, मायक्रो SD स्लॉट, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट आहे. Nokia T10 मध्ये GPS, GLONASS आणि Galileo नेव्हिगेशन टेक्नॉलॉजीसह एक्सीलरोमीटर, ऍम्बीयंट लाइट सेन्सर आणि FM रेडिओ देखील मिळतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile