नोकियाचे फोन्स आपल्या क्लीन, क्लटर फ्री एंड्राइड एक्सपीरियंस आणि वेळच्या वेळी अपडेट मिळणे इत्यादीसाठी ओळखले जातात. पण एक अपडेट मिळण्यामागे एक मोठी प्रक्रिया असते हे अजूनपर्यंत कोणालाच माहित नाही आणि त्यानंतर एका फोनला एक अपडेट मिळतो. नोकिया ने HMD Global च्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून एक माइक्रोसाइट बनवून एंड्राइड अपडेट देण्याची संपूर्ण प्रक्रिया सर्वांसमोर शेअर केली आहे. विशेष म्हणजे काही इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून नोकिया ने या संपूर्ण प्रक्रियेवर प्रकाश टाकला आहे. चला तर मग जाणून घेऊया कि कशाप्रकारे मिळतो एका फोनला एंड्राइड अपडेट.
विशेष म्हणजे गूगलचा लेटेस्ट मोबाईल OS वर्जन आपल्या यात्रेची सुरवात एका चिपसेट वेंडर पासून करतो, जेणेकरून ते त्यासाठी आवश्यक ड्राइवर्सची निर्मिती करू शकतात. त्याबदल्यात एक चिपमेकर एका स्मार्टफोन निर्मात्याला एक HAL म्हणजे (Hardware Abstraction Layer) पाठवायची असते. त्यानंतर एका OS ची निर्मिती सुरु केली जाते , जो त्यांच्या डिवाइस मध्ये चालू शकतो. विशेष म्हणजे एक चिपसेट वेंडरचा कोणत्या प्रोसेसरला या नवीन OS चा सपोर्ट मिळेल आणि कोणाला नाही याचा निर्णय घेतो.
यापुढील प्रोसेस साठी जास्त वेळ लागत नाही. त्यामागील कारण म्हणजे नोकियाचे फोन्स प्योर एंड्राइड वर्जन वर चालतात, याचा अर्थ असा कि नोकिया कडून याला कोणत्याही प्रकारची कोणतीही स्किन किंवा लेयर दिली जात नाही. त्यानंतर नोकिया सॉफ्टवेयर इंटरनल टेस्टिंग साठी पाठवते, इथे हा योग्यरीत्या काम करत आहे कि नाही हे बघितले जाते. पुढील टप्प्यात नोकिया कम्युनिटी येते – जगभरात अधिकृतरीत्या सर्व यूनिट्स मध्ये आणण्यापूर्वी बीटा वर्जन हजारो डिवाइस वर चालवला जातो, आणि टेस्टिंग केली जाते.
यानंतर जी प्रक्रिया उरते त्यात इतर स्टॅन्डर्ड टेस्ट जसे कि ब्लूटूथ आणि वाई-फाई इत्यादींची टेस्टिंग केली जाते. त्यानंतर क्वालिटी चेक आणि अतिरिक्त ऑपरेटर्स टेस्ट ज्या आवश्यक आहेत त्या नंतर केल्या जातात. यानंतर एक फाइनल OTA अपडेट एलिजिबल डिवाइसना रोल आउट केला जातो.