गाडीवर FASTag न लावल्यास दुप्पट टोल? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम, वाचा सविस्तर 

गाडीवर FASTag न लावल्यास दुप्पट टोल? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम, वाचा सविस्तर 
HIGHLIGHTS

सरकारकडून FASTag शी संबंधित एक नवीन नियम लागू

वाहनाच्या विंडशील्डवर FASTag चिकटविणे अनिवार्य केले.

FASTag विंडशील्डवर आढळला नाही, तर वापरकर्त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल.

FASTag New Rule: सर्व चारचाकी वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. होय, सरकारकडून FASTag शी संबंधित एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता सरकारने वाहनाच्या विंडशील्डवर FASTag चिकटविणे अनिवार्य केले आहे. बरेच लोक FASTag विंडशील्डवर चिकटवण्याऐवजी कारच्या आत किंवा खिशात ठेवतात. ज्यामुळे टोल प्लाझावर विनाकारण विलंब होतो आणि इतर राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांची गैरसोय होते.

Also Read: WhatsApp: प्रियजनांना द्या श्रावण सोमवारच्या शुभेच्छा! पहा स्टेटस, Video आणि स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे?

गाडीवर FASTag न लावल्यास दुप्पट टोल

राष्ट्रीय महामार्गावरील वापरकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने वाहनाच्या आतील बाजूस विंडशील्डवर FASTag चिकटविणे अनिवार्य केले आहे. या नवीन नियमानुसार, FASTag विंडशील्डवर आढळला नाही, तर वापरकर्त्यांना दुप्पट टोल फी भरावी लागेल, असे सांगण्यात आले आहे. अधिकृत प्रकाशनातून असे समोर आले आहे की, “NHAI ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत की, समोरच्या विंडशील्डवर FASTag आतून न आढळल्यास टोल लेनमध्ये प्रवेश करणाऱ्या वापरकर्त्यांकडून दुप्पट शुल्क आकारले जाईल.”

NHAI नुसार, “सर्व वापरकर्ता फी कलेक्शन एजन्सी आणि सवलतीधारकांसाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जारी करण्यात आली आहे की, समोरच्या विंडशील्डवर FASTag न लावल्यास दुप्पट वापरकर्ता शुल्क वसूल केले जाईल.”

सर्व टोल प्लाझा वर दिली जाईल माहिती

होय, ही माहिती सर्व वापरकर्ता शुल्क प्लाझावर देखील ठळकपणे प्रदर्शित केली जाईल. NHAI ने सर्व टोल प्लाझावर नवीन कठोर मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यामध्ये, महामार्ग वापरकर्त्यांना समोरच्या विंडशील्डवर FASTag न लावता टोल लेनमध्ये प्रवेश केल्याबद्दलच्या दंडाबद्दल देखील सविस्तर माहिती दिली जाईल.

वारंवार ‘असे’ केल्यास तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महामार्गावर वाहन चालवताना फास्टॅगच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांकडून केवळ दुप्पट टोलच आकारला जाणार नाही. तर, CCTV मध्ये रेकॉर्ड केलेल्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकाद्वारे युजर्सना ब्लॅकलिस्टमध्ये देखील टाकले जाईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo