New UPI Rule: उद्यापासून लागू होणार नवे नियम! सोप्या शब्दात जाणून घ्या नवीन मार्गदर्शक तत्त्वे, अन्यथा…  

New UPI Rule: उद्यापासून लागू होणार नवे नियम! सोप्या शब्दात जाणून घ्या नवीन मार्गदर्शक तत्त्वे, अन्यथा…  
HIGHLIGHTS

NPCI ने अलीकडेच न्यूमेरिक UPI ID सोल्यूशनवर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

UPI चे नवे नियम 1 एप्रिलपासून लागू केले जातील.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश UPI नंबरशी जोडलेल्या पेमेंटसाठी ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करणे होय.

New UPI Rule: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच न्यूमेरिक UPI ID सोल्यूशनवर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश UPI नंबरशी जोडलेल्या पेमेंटसाठी ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करणे होय. महत्त्वाचे लक्षात घ्या की, नवीन मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच नवे नियम 1 एप्रिलपासून लागू होतील. मत्त्वाचे लक्षात घ्या की, UPI मेम्बर्स बँक, UPI ऍप्स आणि थर्ड पार्टी प्रोव्हायडर्ससाठी या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

Also Read: Upcoming Smartphones in April 2025: बजेट ते एक्सपेन्सिव्ह सर्व स्मार्टफोन्स ‘या’ महिन्यात होणार लाँच, पहा यादी

नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट ठेवा.

UPI सेवा वापरणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याला त्याच्या बँकेत नोंदणीकृत मोबाइल नंबर सक्रिय असल्याची खात्री करून घेणे, आवश्यक आहे. जर बँकेचे रेकॉर्ड योग्य मोबाईल नंबरसह अपडेट केले गेले, तरच UPI सेवा कोणत्याही अडथड्याशिवाय वापरता येईल.

New UPI Rule from 1 april many ids will be block know reason

‘या’ युजर्सना नाही करता येणार ट्रांजेक्शन

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डीऍक्टिव्हेटेड मोबाइल नंबरशी जोडलेले UPI ID देखील डी-ऍक्टिव्हेट होतील. जर कोणत्याही UPI युजर्सच्या बँकेत नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर बराच काळ निष्क्रिय असेल, तर वापरकर्त्याचा UPI ID देखील अनलिंक केला जाईल आणि वापरकर्ता UPI सर्व्हिस वापरू शकणार नाही.

महत्त्वाचे लक्षात घ्या

दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार, डिस्कनेक्ट झाल्यानंतर 90 दिवसांनंतर मोबाईल नंबर नवीन वापरकर्त्याला असाइन केला जाऊ शकतो. जर एखाद्या ग्राहकाचा मोबाईल नंबर कॉल, मेसेज किंवा डेटासाठी वापरला जात नसेल, तर टेलिकॉम प्रोव्हायडर्सकडून तो नंबर निष्क्रिय केला जातो.

NPCI चे नवे गाईडलाईन्स

  • नव्या गाईडलाईन्सनुसार, युजरचा बँक-व्हेरिफिकेशन मोबाइल नंबर युजरचे UPI आयडेंटिफायर म्हणून कार्य करेल.
  • यासह युजर्स वेगवेगळे UPI ऍप्स वापरण्यास सक्षम असतील.
  • पुनर्वापरित किंवा सुधारित क्रमांकांमुळे होणाऱ्या चुका टाळण्यासाठी बँक आणि UPI अप्लिकेशन्सना दर आठवड्याला त्यांचे मोबाइल नंबर रेकॉर्ड अपडेट करावे लागतील.
  • न्यूमेरिक UPI ID देण्यापूर्वी अप्लिकेशनला वापरकर्त्याची परवानगी घ्यावी लागेल.
  • वापरकर्त्यांनी या फिचरसाठी सक्रियपणे निवड करणे आवश्यक आहे, ते डीफॉल्टनुसार निवड रद्द केले जाते.
  • जर NPCI पडताळणीमध्ये काही विलंब झाला तर, UPI अप्लिकेशन्स तात्पुरते संख्यात्मक UPI आयडीशी संबंधित समस्या अंतर्गतरित्या सोडवू शकतात. तपासणीच्या उद्देशाने या प्रकरणांचे दस्तऐवजीकरण करून दरमहा NPCI ला अहवाल देणे आवश्यक असेल. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ आणि अप्लिकेशन्सला बेहत द्या.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo