Bigg Boss 16: सलमान खान सप्टेंबरमध्ये प्रोमो शूट करणार, ‘या’ दिवशीपासून सुरू होणार शो !
Bigg Boss 16 नवीन अपडेट
शो चा होस्ट सलमान खान सप्टेंबरमध्ये प्रोमो शूट करणार
'बिग बॉस' 1 ऑक्टोबर 2022 रोजी प्रीमियर होईल
'बिग बॉस'च्या प्रत्येक सीझनची जबरदस्त क्रेझ आहे. 16वा सीझनही सुपरहिट व्हावा अशी निर्मात्यांची इच्छा आहे. 'बिग बॉस'प्रमाणेच OTT वरही 'लॉकअप' सुरू झाला, त्यानंतर दोन्ही शोची तुलना करण्यात आली. अशा परिस्थितीत 'बिग बॉस'च्या निर्मात्यांवर आता भलताच दबाव असेल. सध्या स्पर्धकांचा शोध सुरू आहे. लवकरच ही यादी देखील तयार होणार आहे. आता या शोबद्दल एक नवीन अपडेट आले आहे…
हे सुद्धा वाचा : Oppo चा 64MP कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन, दमदार प्रोसेसरसह मिळेल 33W फास्ट चार्जिंग
'बिग बॉस' बद्दलचे नवीन अपडेट
काही काळापूर्वी असे समोर आले होते की, सलमान खान 'बिग बॉस 16' चा प्रोमो सप्टेंबरमध्ये शूट करू शकतो. टेली चक्कर या वेबपोर्टलनुसार, सलमान खान सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रोमोसाठी शूट करणार आहे. 'बिग बॉस' 1 ऑक्टोबर 2022 रोजी प्रीमियर होईल, जो प्रेक्षक कलर्स टीव्हीवर पाहू शकतील.
यावेळी काय थीम आहे ?
काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस'च्या नव्या सीझनचे फोटो सेटवरून समोर आले होते. यावेळची थीम ऍक्वा म्हणजेच संपूर्ण घराच्या चारही बाजूला पाणी असल्यासारखे फील दिले जाईल. मागील सीझन 'जंगल थीम'वर बनवला होता. त्यात घराभोवती झाडे-झुडपे होती.
'या' सेलिब्रिटींच्या नावांची चर्चा आहे
स्पर्धकांच्या नावांमध्ये, सध्या मुनव्वर फारुकी यांच्या नावाची पुष्टी झाल्याचे वृत्त आहे. मुनव्वर 'लॉकअप'च्या पहिल्या सीझनचा विजेता आहे. अशा परिस्थितीत तो 'बिग बॉस 16' मध्ये आला तर त्याला पाहणे जास्त मनोरंजक असेल. अर्जुन बिजलानी यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांनी नकार दिला असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याशिवाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या शनाया इराणी, मोहित मलिक, नकुल मेहता इ. शो चे ऑफर मिळाले आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile