Google ने नुकतेच Android युजर्ससाठी Android 15 लाँच केले आहे.
Google ने Android 15 सह Theft Detection Lock फिचर देखील उपलब्ध करून दिले आहे.
Theft Detection Lock फिचर फोन चोरीला गेल्यास हे फिचर तुमचा फोन लॉक करेल.
Theft Detection Lock Feature: नुकतेच Google ने Android 15 लाँच केले आहे. Android 15 सह कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन ऍडवान्स आणि सिक्योरिटी फीचर्स सादर केली आहेत. यापैकी एक म्हणजे ‘Theft Detection Lock Feature’ होय. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे गुगलचे एक ऍडव्हान्स सिक्योरिटी फिहकार आहे.
नव्या फिचरद्वारे तुमच्या हातातून चोरीला गेलेला स्मार्टफोन आपोआप लॉक होईल. यासोबतच Offline Device Lock आणि Remote Lock नावाची आणखी दोन सिक्योरिटी फिचर्सदेखील सादर करण्यात आली आहेत. जाणून घेऊयात नव्या सिक्योरिटी फीचर्सबद्दल सविस्तर तपशील-
Android 15 सह येणाऱ्या नव्या Theft Detection Lock फीचरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला नावावरूनच समजले असेल की, फोन चोरीला गेल्यावर हे फीचर खूप उपयुक्त ठरणार आहे. तुमचा फोन चोरीला गेल्यास हे फिचर तुमचा फोन लॉक करेल, ज्यामुळे चोरांना तुमच्या फोनमधील वैयक्तिक डेटा ऍक्सेस मिळणार नाही. पुढे Google ने सांगितले की, जसे चोर तुमचा फोन हिसकावून पळून जातो किंवा बाईकवर पळून जाण्याचा प्रयत्न करतो, त्या क्षणाची जाणीव करून हे फीचर तुमचा फोन आपोआप लॉक करेल.
अशा परिस्थितीत, चोर तुमचा फोन अनलॉक करू शकणार नाही. याद्वारे तुमच्या फोनमधील वैयक्तिक डेटामध्ये कुणालाही प्रवेश करता येणार नाही. हे फीचर सर्व अँड्रॉईड उपकरणांमध्ये उपलब्ध असेल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे फिचर फक्त Android Go वर चालणाऱ्या फोन आणि टॅबवर कार्य करणार नाही.
Offline Device Lock आणि Remote Lock
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने Android 15 सह Offline Device Lock आणि Remote Lock नावाचे दोन फिचर्स देखील जारी केले आहेत.
ऑफलाइन डिव्हाइस लॉकबद्दल बोलायचे झाल्यास चोरीनंतर फोन बराच वेळ ऑफलाइन राहिला तर हे फिचर तुमचे डिव्हाइस लॉक करते.
तर, रिमोट लॉक बद्दल बोलायचे झाल्यास, फोन चोरीला गेल्यावर यूजर्स फोन लगेच दुसऱ्या डिव्हाईसद्वारे लॉक करू शकतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.