मोठी स्क्रीन आणि 8300mAh बॅटरीसह Realme चा अप्रतिम टॅबलेट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
Realme ने आज भारतात आपला लेटेस्ट टॅब Realme Pad 2 lite लाँच केला.
Realme Pad 2 lite टॅब कंपनीने बजेट रेंजमध्ये सादर केला आहे.
Realme Pad 2 lite भारतीय बाजारपेठेत Xiaomi, Lenovo, OnePlus आणि Samsung सारख्या ब्रँडच्या टॅबशी स्पर्धा करेल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चे केवळ स्मार्टफोनच नाही तर टॅबलेट्स देखील भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कंपनीने आज भारतात आपला लेटेस्ट टॅब Realme Pad 2 lite लाँच केला आहे. हा टॅबलेट मोठ्या स्क्रीन साईजसह सादर करण्यात आला आहे. याशिवाय, नवीन टॅबलेटमध्ये 128GB स्टोरेज तसेच स्टिरिओ स्पीकर आणि मजबूत 8300mAh बॅटरी आहे. हे टॅब भारतीय बाजारपेठेत Xiaomi, Lenovo, OnePlus आणि Samsung सारख्या ब्रँडच्या टॅबशी स्पर्धा करेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात नव्या Realme Pad 2 lite ची भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: विशेष आणि जबरदस्त फीचर्ससह Realme P2 Pro 5G भारतात दाखल, जाणून घ्या किंमत
Realme Pad 2 Lite ची भारतीय किंमत
Witness the all-new #realmePad2Lite!
— realme (@realmeIndia) September 13, 2024
With a 90Hz 2K display, Helio G99 chipset & 8300mAh mega battery, it's built for endless entertainment.
Starting at just ₹14,999!
Know more:https://t.co/r5T913WLkohttps://t.co/tILQAa94Of#LessEffortMoreExperience pic.twitter.com/ojH8G1NnuH
Realme Pad 2 lite टॅबच्या 4GB + 128GB मॉडेलची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. तर, 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 16,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, टॅब ची विक्री अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लवकरच सुरू होईल. कंपनीने हा टॅब स्पेस ग्रे आणि नेबुला पर्पल कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे.
Realme Pad 2 Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme Pad 2 lite मध्ये 10.5 इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. तर, डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 450 nits आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, कंपनीने या टॅबमध्ये MediaTek Helio G99 octa-core प्रोसेसर आणि Arm Mali-G57 MC2 दिला आहे. फोटोग्राफीसाठी या टॅबलेटच्या मागील बाजूस 8MP कॅमेरा मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, याद्वारे HD व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार आहे. तर, व्हिडिओ कॉलिंग आणि स्लेफीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
पॉवर देण्यासाठी, या टॅबमध्ये 8300mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W SuperVOOC फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येते. तर, सुरक्षिततेसाठी Realme Pad 2 Lite मध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यामध्ये क्वाड स्टिरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी या टॅबलेटमध्ये Wi-Fi 802.11, ब्लूटूथ 5.3, सिम कार्ड स्लॉट, GPS आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile