Jio ने TV साठी लाँच केला JioTV+ ॲप! 2-इन-1 ऑफरसह मिळेल बरेच काही, वाचा डिटेल्स 

Jio ने TV साठी लाँच केला JioTV+ ॲप! 2-इन-1 ऑफरसह मिळेल बरेच काही, वाचा डिटेल्स 
HIGHLIGHTS

Jio कंपनीने स्मार्ट TV साठी JioTV+ ॲप लाँच केले आहे.

JioTV+ ॲपसह कंपनीने 2 इन 1 ऑफर देखील लाँच केली आहे.

या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना टीव्हीवर 800 डिजिटल टीव्ही चॅनेलचा ऍक्सेस मिळेल.

रिलायन्स Jio कंपनीने स्मार्ट TV साठी JioTV+ ॲप लाँच केले आहे. या ॲपसह कंपनीने 2 इन 1 ऑफर लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत, वापरकर्ते एकाच JioAirFiber कनेक्शनवर 2 स्मार्ट टीव्ही कनेक्ट करू शकतात. या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना टीव्हीवर 800 डिजिटल टीव्ही चॅनेलचा ऍक्सेस मिळेल. याशिवाय, त्यांना 13 हून अधिक OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. जाणून घेऊयात ॲप आणि ऑफरशी संबंधित सर्व तपशील-

JioTV+ ऍप

रिलायन्स Jio ने स्मार्ट टीव्हीसाठी JioTV+ ॲप लाँच केले आहे. यापूर्वी हे ॲप फक्त JioSTB द्वारे उपलब्ध होते. मात्र, आता वापरकर्ते त्यांच्या SmartTV OS वर हे ॲप मोफत डाउनलोड करू शकतात. वर आम्ही 2 इन 1 ऑफरचा देखील उल्लेख केला आहे.

jio tv+ app launched for smart tv

JioTV+ 2-इन-1 ऑफरबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, JioAirFiber वापरकर्ते एकाच कनेक्शनवर 2 टीव्ही कनेक्ट करू शकतात. या ऑफर अंतर्गत मिळणाऱ्या ऑफर्स दोन टीव्हीवर उपलब्ध असतील. या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना 800 हून अधिक डिजिटल टीव्ही चॅनेल्सचा ऍक्सेस मिळेल, ज्यामध्ये 10 हून अधिक भाषांचे समर्थन आहे. ही ऑफर वापरकर्त्यांना 13 पेक्षा जास्त OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन प्रदान करते.

हे ऑफर्स AndroidTV, Amazon FireTV Stick आणि Apple TV सह समाविष्ट आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे ऑफर्स लवकरच LG TV साठी सादर केले जातील. मात्र, लक्षात घ्या की, ही ऑफर Samsung टीव्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार नाही.

पुढील प्लॅन्ससह मिळेल ऑफर

कथित ऑफर JioAirFiber च्या सर्व प्लॅनवर उपलब्ध असेल. JioAirFiber प्रीपेड प्लॅन्सबद्दल बोलायचे झाले तर, ही ऑफर 999 रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व प्लॅनवर उपलब्ध असेल. त्याबरोरबच, या ऑफरचा लाभ JioAirFiber पोस्टपेड वापरकर्त्यांना 599 आणि 899 रुपयांवरील सर्व प्लॅनवर उपलब्ध असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo