JioTV Premium Plans: कंपनीने लाँच केले तीन नवे प्रीपेड प्लॅन्स, मिळेल तब्बल 14 OTT चे सबस्क्रिप्शन Free 

JioTV Premium Plans: कंपनीने लाँच केले तीन नवे प्रीपेड प्लॅन्स, मिळेल तब्बल 14 OTT चे सबस्क्रिप्शन Free 
HIGHLIGHTS

JioTV प्रीमियम सबस्क्रिप्शनसह तीन नवीन प्लॅन्स लाँच

JioTV Premium Plans ची सुरुवातीची किंमत 398 रुपयांपासून सुरु

कंपनीने एक जबरदस्त ऍड-ऑन प्लॅनही लाँच केला आहे.

Reliance Jio ने JioTV प्रीमियम सबस्क्रिप्शनसह तीन नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत. यावर प्रेक्षकांना त्यांच्या मनोरंजनासाठी अनेक ऑप्शन्स मिळणार आहेत. होय, यासह तुम्हाला तब्बल 14 लोकप्रिय OTT ऍप्सचे सदस्यत्व मिळणार आहे. Jio ने पहिल्यांदाच JioTV प्रीमियम प्लॅन सादर केले आहेत. लक्षात घ्या की यापूर्वी Jio युजर्सकडे JioTV ची केवळ मोफत आवृत्ती उपलब्ध होती. चला तर मग नवीन प्लॅन्सची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

JioTV Premium Plans ची सुरुवातीची किंमत 398 रुपयांपासून सुरु होते. यावरील दोन्ही प्लॅन्स तुम्हाला अगदी किफायतशीर किमतीत मिळणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की JioTV Premium सोबत कंपनी JioCinema Premium, Disney+ Hotstar, ZEE5, SonyLIV, Prime Video (Mobile), Lionsgate Play, Discovery+, Docubay, Hoichoi, SunNXT, Planet Marathi, Chaupal, EpicON आणि Kanccha Lannka सारखे 14 OTT ऍप्स ऑफर करते.

JioTV चा 398 रुपयांचा प्लॅन

वर सांगितल्याप्रमाणे, हा सुरुवातीचा प्लॅन आहे. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. ज्यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग सोबत 2GB डेली डेटा देखील मिळत आहे. एवढेच नाही तर, प्लॅनमध्ये 100 फ्री SMS देखील मिळणार आहेत. याशिवाय, रसिक प्रेक्षकांसाठी या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 12 OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

JioTV चा 1,198 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनमध्ये देखील वरील प्लॅनप्रमाणे दररोज 2GB डेटाचा लाभ मिळेल. हा प्लॅन जवळपास तीन महिने म्हणजेच 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत SMS देखील उपलब्ध आहेत. युजर्सच्या मनोरंजनासाठी प्लॅन 14 OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करते. यासह तुम्ही तुमचे आवडते शोज, चित्रपट आणि बरेच काही जाहिरातमुक्त बघू शकता.

reliance jio owner mukesh ambani standing with a mic sharing some information about reliance jio plans

JioTV चा 4,498 रुपयांचा प्लॅन

कंपनीला या प्लॅनमध्ये 2GB डेली डेटा ऑफर करत आहेत. मात्र, या प्लॅनची वैधता संपूर्ण वर्षभराची आहे म्हणजेच पूर्ण 365 दिवसांची आहे. तसेच, या प्लॅनसह वापरकर्त्यांना 14 OTT चे मोफत सबस्क्रिप्शनची सुविधा उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत SMS देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणेज हा प्लॅन प्रायोरिटी कस्टमर केअर सर्व्हिससह येईल.

148 रुपयांचा ऍड-ऑन प्लॅन

वरील प्लॅन्ससह कंपनीने ऍड-ऑन प्लॅनही लाँच केला आहे, ज्याची किंमत 148 रुपये आहे. यामध्ये यूजर्सना 12 OTT चे सब्सक्रिप्शन मिळत आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS ची सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

‘अशा’प्रकारे नवे प्लॅन्स ऍक्टिव्ह करा.

सर्व नवीन प्लॅन्सचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरसह ऍपमध्ये साइन इन करावे लागेल. त्यानंतर होम स्क्रीनवर JioTV Premium टॅब दिसणार आहे. या ऑप्शनमध्ये जाऊन या नवीन प्लॅन्ससाठी सहजपणे दावा करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo