New Aadhaar App Benefits: चुटकीसरशी होतील सर्व महत्त्वाची कामे! जाणून घ्या नव्या ऍपचे भारी फायदे

आधार कार्डचा वापर आणखी सुलभ करण्यासाठी एक नवीन Aadhaar App लाँच
Aadhaar App द्वारे लोकांची वेरिफिकेशनची प्रक्रिया अवघ्या काही वेळात होईल.
हे नवीन ऍप देखील UIDAI च्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे.
New Aadhaar App Benefits: अलिकडेच मोदी सरकारने आधार कार्डचा वापर आणखी सुलभ करण्यासाठी एक नवीन आधार अॅप लाँच केले आहे. या ऍपद्वारे लोकांची वेरिफिकेशनची प्रक्रिया अवघ्या काही वेळात होईल. होय, हे आता UPI पेमेंट इतकेच सोपे झाले आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, ज्याप्रमाणे तुम्ही दुकानदाराला पेमेंट करण्यासाठी तुमच्या फोनवरून QR कोड स्कॅन करता. अगदी त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या फोनवरून QR कोड स्कॅन करून तुमची ओळख सिद्ध करू शकाल.
Also Read: New Aadhaar App: कार्ड आणि फोटोकॉपी सोबत ठेवण्याची गरज संपली! सरकारने लाँच केले नवीन ऍप
आम्ही तुम्हाला सांगतो की, आजकाल अनेक सेवांमध्ये आधारचा वापर केला जात असल्याने, नव्या ऍपला भारतासाठी गेम चेंजर असे देखील म्हटले जात आहे. नव्या आधार ऍपचे महत्त्वाचे फायदे जाणून घेऊयात-
New Aadhaar App ‘अशा’ प्रकारे करेल कार्य
नवी आधार ऍपची कार्यशैली मुळातच खूप सोपी आहे. आता तुम्हाला तुमच्या पाकिटात फिजिकल आधार कार्ड ठेवण्याची गरज नाही. यासाठी तुमचा स्मार्टफोनंच पुरेसा आहे. जर तुम्ही परीक्षा केंद्र, रुग्णालय किंवा बँकेत इ. ठिकाणी जात आहेत, तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला फोनमधील नवीन आधार ऍप ओपन करावे लागेल.
त्यानंतर तिथे दिलेला QR कोड स्कॅन करावा लागेल. स्कॅन पूर्ण झाल्यानंतर तुमची ओळख पडताळणी अवघ्या काही सेकंदातच होईल. भारत आपल्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करत आहे, या दिशेने हे ऍप म्हणजे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
नव्या Aadhaar App चे फायदे
- हॉटेल रिसेप्शन, दुकाने, बँका इत्यादी ठिकाणी आधार कार्डची फोटो प्रत दाखवण्याची आवश्यकता उरणार नाही.
- QR कोड स्कॅन करून तुमची पडताळणी केली जाईल, यासह तुमची वैयक्तिक माहिती देखील सुरक्षित राहील.
- आधार पडताळणीसाठी तुम्हाला तुमचा फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनर देण्याची देखील आवश्यकता नाही.
- तुमच्या आधार प्रतीचा गैरवापर होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात येईल. आधारची प्रत शेअर केल्यानंतर, लोकांना काळजी वाटते की, त्याचा गैरवापर होऊ शकतो, आता त्यांना याची काळजी करण्याची गरज नाही.
- स्मार्टफोनद्वारे पडताळणीची प्रक्रिया असल्यामुळे अधिकाधिक लोक या सुविधेचा वापर करण्यास सक्षम असतील.
महत्त्वाचे सांगायचे झाल्यास, नवीन Aadhaar App चे नाव उघड झालेले नाही. मात्र, काही अहवालांनुसार, हे m-Aadhaar App चे अपडेट केले गेले आहे. हे नवीन ऍप देखील UIDAI च्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. अॅपच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीची ओळख पडताळता येते. तसेच, यासह फसवणूकिची प्रकरणे रोखण्यास देखील मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile