हिरामंडीसाठी Netflix कोट्यवधी रुपये खर्च करणार, संजय लीला भन्साळींची फीस ऐकून बसेल धक्का

हिरामंडीसाठी Netflix कोट्यवधी रुपये खर्च करणार, संजय लीला भन्साळींची फीस ऐकून बसेल धक्का
HIGHLIGHTS

'हिरामंडी' चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प

या चित्रपटाला Netflix कडून मोठा पाठिंबा

चित्रपटावर Netflixकडून तब्बल 200 कोटी रुपयांचा खर्च

हिरामंडी हा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सने या चित्रपटाशी आपला संबंध जाहीर केला, याचाच अर्थ या चित्रपटाला नेटफ्लिक्सकडून मोठा पाठिंबा मिळणार आहे. आता या चित्रपटासाठी नेटफ्लिक्स भारी रक्कम खर्च करणार असल्याचे समोर येत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी नेटफ्लिक्सकडून तब्बल 200 कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. मात्र, याशिवाय या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी स्वत: संजय लीला भन्साळी तब्बल 65 कोटी रुपये घेत असल्याचेही एका वृत्तातून समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा :  Big Boss OTT : करण कुंद्राने केले करण जोहरला रिप्लेस? प्रेयसी तेजस्वी प्रकाशबरोबर शोमध्ये एंट्री !

बॉलीवुड हंगामाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स या चित्रपटासाठी म्हणजेच हिरामंडीसाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्याबोरबच, भंसाली सुमारे 60-65 कोटी रुपये डायरेक्‍टिंग फी घेत आहेत, असे दावा सूत्रांनी केला आहे. याव्यतिरिक्त, हिरामंडीच्या निर्मितीसाठी आणि सर्व कलाकारांना पगार देण्यासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च होणार आहेत.", अशी माहिती मिळाली आहे. 

भुल भुलैया 2 ने आतापर्यंत किती रुपये कमवले?  

 अभिनेता कार्तिक आर्यनचा चित्रपट भूल भुलैया 2 अजूनहि बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई करतोय. अनीस बज्मी दिग्दर्शित चित्रपटाने तिसर्‍या शनिवारीही कमाईमध्ये 60 टक्के वृद्धी केली आहे. या चित्रपटाने यावेळी सुमारे 4.50 कोटींची कमाई केली आहे, त्यानंतर या चित्रपटाचे कलेक्शन 147 कोटींवर पोहोचले आहे. मात्र, अलीकडेच अभिनेता अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट आल्यानंतरही भूल भुलैयाच्या प्रसिद्धीवर कोणताही परिणाम झालेला नाही. 

 तिसर्‍या आठवड्याच्या शेवटी, भूल भुलैया 2 ने मुंबईत सुमारे 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे, याशिवाय दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये या चित्रपटाने सुमारे 40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याबरोबरच, कोरोना व्हायरसच्या महामारीनंतर हा सर्वात हिट चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo