Netflix हे असे एक OTT प्लॅटफॉर्म आहे, जे जवळपास प्रत्येक सिनेरसिकाच्या मोबाईलमध्ये आढळेल. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दररोज अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात. हे प्लॅटफॉर्म भारतातही खूप लोकप्रिय आहेत. मात्र, नेटफ्लिक्सबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. बघा सविस्तर –
आता अमेरिकेतील नेटफ्लिक्स वापरकर्ते त्यांचे पासवर्ड एकमेकांना शेअर करू शकणार नाहीत. याविरोधात मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. नव्या बातमीनुसार अंतर्गत युजरला जास्त पैसे मोजावे लागतील. हा नवा नियम भारतातही लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.
नेटफ्लिक्सने अखेर यूएस आणि यूकेमध्ये पासवर्ड शेअरिंगवर लॉन्ग-अवेटेड सुरू केली आहे. कंपनीचा नफा वाढावा आणि युजर्स वाढावेत यासाठी असे करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे. या ऍपचे पासवर्ड शेअरिंग भारतातही सामान्यच आहे.
तुम्ही तुमचे Netflix खाते आणि पासवर्ड इतर कोणाशीही शेअर केल्यास, Netflix तुमच्या खात्याचा ऍक्सेस ब्लॉक करणार आहे. मात्र, हा नियम भारतात कधी लागू होणार याबाबत अद्याप माहिती पुढे आलेली नाही. नेटफ्लिक्स इंडियावर बॉलीवूड, हॉलीवूड आणि इतर मजेशीर कन्टेन्ट स्ट्रीम केला जात आहे.