Netflix Scam: आजकाल स्कॅमर्स जनतेला फसवण्यासाठी अनेक नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. दरम्यान, सायबर सुरक्षा फर्म बिटडेफेंडरने एक नवीन घोटाळा फ्लॅग केला आहे, जो प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix वापरकर्त्यांना त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती बळकावण्यासाठी लक्ष्य करत आहे. घोटाळेबाज लोकांना फसवण्याच्या मार्गांनी खरोखर सर्जनशील होत आहेत, हे यावरून समजते.
Also Read: Finally! आगामी OnePlus 13 ची प्रतीक्षा संपली! अखेर फोनचे भारतीय लाँच Confirm, पहा डिटेल्स
आम्ही तुम्हाला सांगतो की, स्कॅमर ग्राहकांचे Netflix पेमेंट अयशस्वी झाल्याचा दावा करणारे बनावट संदेश पाठवतात. पुढे आलेल्या अहवालानुसार, हा घोटाळा युनायटेड स्टेट्स, जर्मनी, भारत, स्पेन आणि ऑस्ट्रेलियासह 23 देशांतील ग्राहकांवर लक्ष्य करत आहे.
नवा Netflix स्कॅम हा एक प्रकारचा फिशिंग स्कॅम आहे. यामध्ये Netflix खात्याच्या पेमेंटसह समस्यांचा दावा करणारे फसवे SMS पाठवणाऱ्या स्कॅमर यांचा समावेश आहे.
एवढेच नाही तर, स्कॅमर्स हे मॅसेजेस तुमच्या स्थानिक भाषांमध्ये देखील पाठवतात. उदा. “NETFLIX: तुमच्या पेमेंटवर प्रक्रिया करताना समस्या आली. तुमच्या सेवा सक्रिय ठेवण्यासाठी, कृपया येथे साइन इन करा आणि तुमच्या तपशीलांची पुष्टी करा: https://account-details[.]com.” आणि “तुमचे शेवटचे पेमेंट नाकारले गेले. तुमची पेमेंट माहिती येथे अपडेट करा: https://homepage-nflix[.]com.” इ.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, सामान्य जनतेची गोळा केलेली संवेदनशील माहिती नंतर डार्क वेबवर विकली जाते. त्याबरोबरच, लोकांच्या पैशासाठी देखील त्याचा गैरवापर केला जातो.