गेमिंग लव्हर्स ! Netflix वर लवकरच येणार जबरदस्त नवीन गेम्स, वाचा संपूर्ण डिटेल्स
Netflix ने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या प्लॅटफॉर्मवर 40 हून अधिक गेम्स जोडण्याची घोषणा केली.
कट द रोप गेम तब्बल 10 वर्षांपूर्वी लाँच करण्यात आला होता.
Netflix सिरीज Queen's Gambit वर आधारित गेम देखील यादीत समाविष्ट
Netflix ने Gambit: Chess, LEGO Legacy: Heroes Unboxed, Cut the Rope Daily, Paper Trail और OxenFree II: Lost Signals या नव्या भारी गेम्सची घोषणा केली आहे. "हे व्हीडिओ गेम्स खास गेमिंग लव्हर्ससाठी आणले गेले आहेत. हे गेम्स लवकरच लोकप्रिय होणार आहेत. ", असा कंपनीचा दावा आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या प्लॅटफॉर्मवर 40 हून अधिक गेम्स जोडण्याची घोषणा केली होती. यासोबतच 70 नवीन गेम तयार करण्याची घोषणाही करण्यात आली.
वरील गेम्स नेटफ्लिक्सवर कधी येणार ?
Lego Legacy: Heroes Unboxed आणि Paper Trail गेम लवकरच प्लॅटफॉर्मवर आणले जातील. तर, ऑक्सनफ्री II 12 जुलै रोजी, क्वीन्स गॅम्बिट: चेस 25 जुलै रोजी रिलीज होणार आहेत. तसेच, कट द रोप डेली गेम 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल, अशी माहिती मिळाली आहे.
Oxenfree II: Lost Signals
हा एडव्हेंचर गेम डेव्हलपर नाईट स्कूल स्टुडिओने तयार केला आहे, जो पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ऑक्सनफ्रीचा हा सिक्वेल आहे. हा गेम नेटफ्लिक्स प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
LEGO Legacy: Heroes
व्हिडिओ गेम फेब्रुवारीमध्ये जवळपास प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला. तर, एप्रिलमध्ये अधिकृतपणे बंद झाला, परंतु आता तो नेटफ्लिक्सवर येत आहे. केवळ सदस्य हा गेम खेळण्यास सक्षम असणार आहेत.
Paper Trail
पेपर ट्रेल गेममध्ये वापरकर्त्यांना कागदाचे जग पाहायला मिळेल. हा गेम नेटफ्लिक्सच्या मोबाइल सदस्यांसाठी ऑगस्टमध्ये सादर केला जाईल.
Queen’s Gambit: Chess
हा गेम लोकप्रिय Netflix सिरीज Queen's Gambit वर आधारित आहे. प्राइम सदस्य हा गेम बेथ म्हणून खेळू शकतात, कोडी सोडवू शकतात आणि खेळण्यासाठी मित्रांना पण आमंत्रित करू शकतात. यामध्ये खेळाडूंना वेब सीरिजमध्ये उपस्थित असलेल्या पात्र पाहायला मिळतील.
Cut the Rope
आम्ही तुम्हाला सांगतो की, कट द रोप गेम तब्बल 10 वर्षांपूर्वी लाँच करण्यात आला होता. मात्र, हा गेम अजूनही ट्रेंडमध्ये चालतो. आता या गेमचा नवीन अवतार बघायला मिळणार आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile