Netflix ने यूजर्सना दिला झटका! आता पासवर्ड शेअर करण्यासाठी लागेल एक्सट्रा चार्ज, वाचा डिटेल्स

Netflix ने यूजर्सना दिला झटका! आता पासवर्ड शेअर करण्यासाठी लागेल एक्सट्रा चार्ज, वाचा डिटेल्स
HIGHLIGHTS

Netflix कडून मोठा युजर्सना झटका

आता पासवर्ड शेअरिंगसाठी देखील मोजावे लागतील पैसे

हा नवीन नियम 2023 पासून जारी केला जाईल

Netflix हा जगातील सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आहे. अलीकडे, नेटफ्लिक्स अनेक बदल करत आहे, त्यापैकी काही वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहेत आणि काही बदल युजर्ससाठी परवडणारे नाहीत. जर तुम्ही अप्रत्यक्ष Netflix वापरकर्ते असाल, म्हणजे तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या किंवा मित्राच्या खात्यावर Netflix पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Apple ने सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये लाँच केला नवीन 4K TV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

 नेटफ्लिक्स एक नवीन फीचर जारी करणार आहे, जो पासवर्ड शेअरिंगला पेड फीचर बनवेल म्हणजेच जर तुम्ही तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत शेअर केला असेल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Netflix कडून मोठा झटका 

नेटफ्लिक्सचा एखादा शो किंवा चित्रपट पाहण्यासाठी आपले अकाउंट नसले तरी आपण आपल्या जवळच्या लोकांच्या अकाउंटचा पासवर्ड घेऊन तो शो बघता येतो. यानंतर, तुम्हाला हे करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील, याबाबत नेटफ्लिक्सने खात्री केली आहे.

पासवर्ड शेअर करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील

नेटफ्लिक्सने 'नेटफ्लिक्स प्रोफाईल ट्रान्सफर' फीचर या नवीन फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने हे OTT प्लॅटफॉर्म पासवर्ड शेअरिंगवर नियंत्रण ठेवण्याची आशा करत आहे. हा नवीन नियम 2023 पासून जारी केला जाईल आणि या अंतर्गत पासवर्ड शेअर करण्यासाठी सब-खाते तयार करावे लागेल, ज्यासाठी पैसे द्यावे लागतील.

सध्या याची किंमत किती असेल हे सांगण्यात आलेले नाही, पण रिपोर्ट्स आणि सूत्रांनुसार पासवर्ड शेअरिंगची किंमत $3-$4 (अंदाजे 250-330 रुपयांच्या दरम्यान) असू शकते. भारतात याची किंमत किती असेल आणि हे फीचर कधी रिलीज होईल हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo