मनोरंजन महागले! Netflix ने वाढवले प्लॅन्सचे दर पण ‘या’ युजर्सना दिलासा, तपासा स्वस्त Alternatives। Tech News
Netflix ने पुन्हा एकदा Netflix सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत वाढवली आहे.
भारतात Netflix सब्स्क्रिप्शन प्लॅन्सचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत.
तुम्हाला या किमती जास्त वाटत असल्यास Netflix ऐवजी पुढील लोकप्रिय पर्याय बघा.
लोकप्रिय प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix ने पुन्हा एकदा Netflix सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत वाढवली आहे. बऱ्याच काळापासून Netflix आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढवणार असल्याचे बोलले जात होते. आता अखेर OTT प्लॅटफॉर्मने परत एकदा प्लॅन्सची किंमत वाढवत आहे.
हे सुद्धा वाचा: Amazon Sale दरम्यान Lava Agni 2 5G वर तब्बल 6 हजार रुपयांचे Discount, बंपर ऑफर्स उपलब्ध। Tech News
‘या’ देशांमध्ये Netflix सब्स्क्रिप्शन महागले
आम्ही तुम्हाला सांगतो की, Netflix सबस्क्रिप्शनच्या नव्या किमतीचा फटका US, UK आणि France मधील युजर्सना होऊ शकतो. खरं तर, या देशांमध्ये प्लॅन्सच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. लक्षात घ्या की, भारतात Netflix सब्स्क्रिप्शन प्लॅन्सचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत. होय, या बाबतीत भारतीयांना अजूनही दिलासा आहे.
Netflix सब्सक्रिप्शनच्या किमती कितीने वाढतील?
या वर्षाच्या तिसर्या तिमाहीतील कमाईचा अहवाल शेअर करताना कंपनीने घोषणा केली आहे की, ती आपल्या मूळ प्लॅन्सची किंमत प्रति महिना $9.99 वरून $11.99 पर्यंत वाढवणार आहे. याशिवाय, प्रीमियम प्लॅनची किंमत प्रति महिना $19.99 वरून $22.99 प्रति महिना केली आहे. मात्र, जाहिरात-समर्थित प्लॅन्सची किंमत अजूनही समान आहे.
आता जर तुम्हाला ही किंमत खूप जास्त वाटत असेल, तर तुम्ही Netflix ऐवजी पुढील लोकप्रिय पर्याय तपासू शकता.
Amazon Prime Video
Netflixला सुरुवातीपासूनच लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video कडून जबरदस्त स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. येथे ग्राहकांना जवळपास 26,000 टायटल्स मिळतात. Amazon Prime Video टायटल्स म्हणजेच चित्रपट, टीव्ही शो आणि ओरिजिनल्सच्या बाबतीत नेटफ्लिक्सला मागे टाकते.
Disney+
या प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला मार्वल, पिक्सर, नॅशनल जिओग्राफिक, वॉल्ट डिजनी आणि इतरांचे आगामी टीव्ही शो आणि ओरिजनल्स बघायला मिळतात. यासह, Disney+ हा नेटफ्लिक्सचा चांगला आणि मोठा Alternative आहे.
Apple TV+
आम्ही तुम्हाला सांगतो की, चांगले चित्रपट आणि मूळ चित्रपटांव्यतिरिक्त तुम्हाला नेटफ्लिक्सच्या तुलनेत Apple TV+ वर चांगले टीव्ही शो मिळतात. Apple TV+ देखील नेटफ्लिक्सचा चांगला Alternative ठरू शकतो.
Hulu
तुम्ही नेटफ्लिक्सशी सुसंगत पर्याय शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही Hulu चे सबस्क्रिप्शन खरेदी करू शकता. येथे तुम्हाला चित्रपट, टीव्ही शो आणि ओरिजिनलची प्रचंड श्रेणी मिळणार आहे. तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर 3000+ टायटल्स मिळतील, जी जवळपास Netflix सारखीच आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile