मैत्री पडेल महागात ! Netflix ने आणला नवा नियम, दरमहा द्यावे लागतील 250 रुपये

Updated on 04-Jan-2023
HIGHLIGHTS

Netflix वर लवकरच येणार नवीन नियम

नवीन पासवर्ड शेअरिंग फिचरची चाचणी सुरु

2022 मध्ये, गेल्या 10 वर्षांत प्रथमच वापरकर्त्यांच्या संख्येत घट

तुम्ही मित्र आणि नातेवाईकांची Netflix खाती वापरता का? तसे असल्यास, तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे! कारण आता मित्रांचा पासवर्ड वापरून नेटफ्लिक्स मोफत चालवता येणार नाही. Netflix एक नवीन पासवर्ड शेअरिंग फीचर घेऊन येत आहे. ज्यामध्ये घराबाहेरील लोकांना नेटफ्लिक्स अकाउंटमध्ये लॉग इन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या नवीन नियमांनुसार, नेटफ्लिक्स वापरकर्ते त्यांचे सदस्यत्व त्यांच्या घराबाहेर कोणाशीही शेअर करू शकणार नाहीत. घराबाहेरील कोणत्याही वापरकर्त्यांना Netflix चालवण्यासाठी पैसे द्यावे लागतील.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Vivo T1 5G वर 22 हजारांची सूट, Flipkart वरून करा ऑर्डर…

250 रुपये द्यावे लागतील

नेटफ्लिक्स काही लॅटिन अमेरिकन देशांमध्ये नवीन पासवर्ड शेअरिंग फिचरची चाचणी घेत आहे. यामध्ये कोस्टा रिका, चिली, पेरू या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये नेटफ्लिक्स खाती चालवण्यासाठी मित्र आणि घराबाहेरील लोकांना $3, दरमहा सुमारे 250 रुपये आकारले जातील. मात्र, भारतातील मित्रांच्या खात्यावर नेटफ्लिक्स चालविण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील? सध्या याबाबत कोणतीही माहिती नाही.

पण प्रश्न असा पडतो की, घराबाहेर कोण आहे हे नेटफ्लिक्स कसे ओळखणार? यासाठी नेटफ्लिक्स आयपी ऍड्रेस, डिव्हाईस आयडी आणि अकाउंट अ‍ॅक्टिव्हिटीद्वारे पासवर्ड शेअरिंगचा नवीन नियम लागू करेल. म्हणजे नेटफ्लिक्स कोणत्या डिव्हाईसवर आयडी, इंटरनेट आयपी ऍड्रेस आणि लोकेशनवर लॉग इन करत आहे ते तपासेल. अशा प्रकारे नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म हे ट्रॅक करेल की तुम्ही इतर कोणाचे नेटफ्लिक्स खाते वापरत आहात की नाही?

नेटफ्लिक्सचे म्हणणे आहे की 2022 मध्ये, गेल्या 10 वर्षांत प्रथमच, वापरकर्त्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सवर जाहिराती दाखवण्याची प्रक्रिया नेटफ्लिक्सने गेल्या वर्षीच सुरू केली होती.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :