OTT प्लॅटफॉर्मच्या जगात Netflix हे एक प्रसिद्ध नाव आहे. अनेक आकर्षक शोमुळे प्रेक्षकांनी या प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवली आहे. मात्र, आता त्याचे ग्राहक कमी होऊ लागले आहेत. ब्रँडनुसार, याचे कारण म्हणजे त्यांचे सबस्क्रिप्शन प्लॅन्स होय. वास्तविक, तुम्हाला नेटफ्लिक्सवर स्वस्त सब्स्क्रिप्शन प्लॅन्स मिळत नाहीत. यामुळे त्यांच्या ग्राहकांची संख्या कमी होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Samsung Galaxy Z Flip 4 लवकरच होणार लाँच, जाणून घ्या संभाव्य फीचर्स
अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने आपल्या प्लॅन्समध्ये बदल केला आहे. अहवालानुसार, गेल्या एका वर्षात प्लॅटफॉर्मने 2 लाख सदस्य गमावले आहेत. यामुळे कंपनीने 300 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
Netflix चे CEO Ted Sarandos यांच्या मते, जाहिरात-समर्थित प्लॅन्स लवकरच सुरु होतील. एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या मागील अहवालानुसार, या वर्षाच्या अखेरीस कंपनी नवीन योजना जारी करेल. Sarandos कबूल करतात की त्यांनी मोठ्या ग्राहक वर्गाकडे दुर्लक्ष केले आहे.
मुलाखतीदरम्यान, ते म्हणाले की, असे बरेच लोक आहेत जे मानतात की नेटफ्लिक्स महाग आहे आणि आम्हाला जाहिरातींमुळे कोणतीही अडचण नाही. त्यांनी सांगितले की, आम्ही जाहिरात श्रेणी जोडत आहोत. मात्र, आम्ही फक्त अशा लोकांसाठी जाहिरात स्तर जोडत आहोत ज्यांना त्यामुळे काही हरकत नाही.
आत्ता कंपनीचे प्लॅन 149 रुपयांपासून सुरू होतात. या प्लॅनमध्ये यूजर्सना फक्त मोबाईलवर कंटेंट पाहण्याची सुविधा मिळते. तसेच, वापरकर्ते एका वेळी फक्त एकाच स्क्रीनवर अकाउंट ऍक्सेस करण्यास सक्षम असतील.
यामध्ये तुम्हाला टीव्ही किंवा लॅपटॉपवर नेटफ्लिक्सचा ऍक्सेस मिळत नाही. दरम्यान, 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये, तुम्ही टीव्ही आणि लॅपटॉपवर कंटेंट पाहू शकता. कंपनीच्या आगामी प्लॅन्सची किंमत आणखी कमी असण्याची शक्यता आहे.