वेब सिरीज पहायचे असो किंवा तुमचे आवडते चित्रपट. यासाठी जगभरात OTT NETFLIX चा वापर केला जातो. अल्पावधीतच नेटफ्लिक्सने ग्राहकांमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. पण कालांतराने त्याची लोकप्रियता कमी होत गेली. त्यानंतर एक वेळ अशी आली की, नेटफ्लिक्सला आपले सदस्यही गमवावे लागले. शिवाय आर्थिक नुकसानही झाले. दरम्यान, कंपनीने अलीकडेच आपल्या OTT प्लॅटफॉर्ममध्ये काही मोठे बदल करणार असल्याचे सांगितले आहे.
हे सुद्धा वाचा : तुमच्या आवाजावर काम करतील Crossbeatsचे नवीन इअरबड्स, किंमत फक्त 1,599 रुपये
या बदलामुळे वापरकर्त्यांना नेटफ्लिक्सचे सदस्यत्व घेणे स्वस्त होणार आहे. प्लॅन स्वस्त करण्यासोबतच त्यात एक ट्विस्ट देखील जोडला गेला आहे. आज आम्ही तुम्हाला नेटफ्लिक्सच्या या नवीन प्लॅनची सर्व माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत…
या Netflix ट्विस्टनंतर, तुमचा अनुभव थोडा वेगळा असू शकतो. खरं तर, कंपनीला काही काळापासून तोटा सहन करावा लागत होता आणि ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीने असे पाऊल उचलले आहे की, तुम्हालाही फायदा होईल आणि कंपनीला त्रास देखील सहन करावा लागणार नाही. कंपनीने अलीकडेच सांगितले की, आता Netflix आपला स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन लवकरच बाजारात उपलब्ध करून देणार आहे. तुम्ही आता पूर्वीप्रमाणे नेटफ्लिक्सवर जाहिरातमुक्त सामग्री वापरण्यास सक्षम असणार नाही.
कंपनीने म्हटले की, आता सर्व स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन वापरकर्त्यांना जाहिराती देखील दाखवतील. जाहिरातीमुळे कंपनीचा महसूलही वाढणार आहे. काही काळापूर्वी, कंपनीने आपले सबस्क्रिप्शन दर कमी केले होते आणि आता ते जाहिरातींसह स्वस्त योजना आणण्याबद्दल बोलत आहेत.
नेटफ्लिक्सचे CEO टेड सरंडोस यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका मुलाखतीदरम्यान माहिती देताना त्यांनी सांगितले की, कंपनी लवकरच ऍड सपोर्ट सबस्क्रिप्शन आणणार आहे. मात्र, कंपनी ही योजना कधी सुरू करणार आहे हे टेडने सांगितले नाही. या वर्षाच्या अखेरीस तुम्हाला हे सर्व बदल पाहायला मिळतील, अशी शक्यता आहे.