नेटफ्लिक्सचे जवळपास 7 करोड ग्राहक आहेत. ही कंपनी नावाजलेले टीव्ही नेटवर्क आणि मूव्ही स्टुडियोजसह भागीदारीमध्ये ऑनलाइन कंटेंट उपलब्ध करण्यासोबत ऑरिजनल शोसुद्धा बनवते.
अमेरिकेची ऑन-डिमांड स्ट्रीमिंग सेवा देणारी कंपनी नेटफ्लिक्स लवकरच भारतात आपली सेवा करणाराय. तसेच ही कंपनी आपली सेवा CES 2016 मध्ये सादर करेल अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. ह्या कार्यक्रमाचे आयोजन ६ ते ९ जानेवारीपर्यंत अमेरिकेच्या लास वेगसमध्ये केेले जाणार आहे. हा कार्यक्रमा ४ दिवस चालेल आणि ह्यात अनेक छोट्या-मोठ्या टेक कंपन्या सहभागी होतील.
भारतात आपली सेवा सुरु करण्यासाठी नेटफ्लिक्सने एक टेलिकॉम ऑपरेटरचे 4G नेटवर्क करण्याचा करार केला आहे. कंपनीने ह्याआधी आपली सेवा सिंगापूर आणि हाँगकाँगसह ४ आशियाई देशांमध्ये २०१६ च्या सुरुवातीला सुरु करण्याची माहिती दिली होती. ही माहिती हिंदू बिजनेसलाइनमध्येही दिली आहे.
तसे आतापर्यंत नेटफ्लिक्सला भारतात अधिकृतरित्या लाँच केले गेले नाही, मात्र अनेक यूजर थर्ड पार्टी टूलच्या मदतीने ह्याचा येथेही फायदा करुन घेतायत.
नेटफ्लिक्सचे जवळपास 7 करोड ग्राहक आहेत. ही कंपनी नावाजलेले टीव्ही नेटवर्क आणि मूव्ही स्टुडियोजसह भागीदारीमध्ये ऑनलाइन कंटेंट उपलब्ध करण्यासोबत ऑरिजनल शोसुद्धा बनवते.
ऑरेंज इज द न्यू ब्लॅक, हाउस ऑफ कार्ड्स, मार्वल एक जेसिका जोन्स आणि डेयरडेविल्स काही असे कार्यक्रम आहेत, जे एक्सक्लुसिव्हरित्या नेटफ्लिक्सवर उपलबध आहेत. नेटफ्लिक्सच्या सेवेसाठी अमेरिकेत यूजरला 8.99 डॉलर(जवळपास ६०० रुपये) प्रति महीना भरावे लागतात.