OTT प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज, शो आणि नवीनतम चित्रपट पाहण्यासाठी वापरकर्ते Netflix, Hotstar, Prime Video चे सदस्यत्व घेतात. स्मार्टफोन वापरकर्ते महागडे रिचार्ज देखील करतात, ज्यामध्ये हे सबस्क्रिप्शन सामील असतात. त्यामुळे, आज आम्ही या सर्व प्लॅटफॉर्मच्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या सर्वात स्वस्त प्लॅन्सबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला यासाठी महागडे रिचार्ज घेण्याची आवश्यकता उरणार नाही.
हे सुद्धा वाचा : Qualcomm Snapdragon 8 Gen 3 : Android स्मार्टफोनचा सर्वात 'पावरफुल प्रोसेसर' लाँचसाठी सज्ज
Netflix च्या मोबाईल प्लानची किंमत 149 रुपये आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्ते 1 मोबाइल स्क्रीनवर नेटफ्लिक्स ओरिजनल वेब सीरिजचा आनंद घेऊ शकतात. अलीकडेच नेटफ्लिक्सने अनेक ओरिजनल्स आणि नवीन चित्रपट प्रदर्शित केला आहे. त्यात डाउनलोडचा पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला जाहिरातमुक्त टीव्ही शो आणि चित्रपट पाहता येतील.
Disney Plus Hotstar च्या मोबाईल सबस्क्रिप्शनची किंमत 499 रुपये आहे. हे केवळ एका मोबाइल डिव्हाइसला समर्थन देतो. help.hotstar.com वरून ही माहिती मिळाली आहे. हॉटस्टारवर अनेक सिरीज आणि अनेक टीव्ही शो उपलब्ध आहेत.
Amazon ची व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओची मोबाइल सबस्क्रिप्शन योजना आहे. त्याचे नाव Prime Video Mobile Edition आहे आणि त्याच्या वार्षिक योजनेची किंमत 599 रुपये आहे. यामध्ये ही सेवा फक्त मोबाईलवरच घेता येणार आहे. या प्लॅनमध्ये एका वेळी एकच वापरकर्ता व्हिडिओचा आनंद घेऊ शकतो.
मोबाईल सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त, टीव्ही आणि लॅपटॉपवर काम करणाऱ्या प्लॅन्सची किंमत जास्त आहे. उदाहरणार्थ, प्राइम व्हिडिओची वार्षिक सदस्यता 599 रुपये आहे, तर टीव्हीची सदस्यता 1500 रुपये आहे. तर नेटफ्लिक्सच्या मोबाइल व्हर्जनची किंमत 149 रुपये आणि टीव्ही व्हर्जनची किंमत 199 रुपये आहे. Hotstar च्या मोबाइल सबस्क्रिप्शनची किंमत 499 रुपये आहे आणि टीव्ही व्हर्जनची किंमत 899 रुपये आणि 1499 रुपये आहे.