Netflix Plan: Netflix चे स्वस्त प्लॅन लवकरच लाँच होणार, ‘या’ मोठ्या कंपनीसोबत झाली पार्टनरशिप

Netflix Plan: Netflix चे स्वस्त प्लॅन लवकरच लाँच होणार, ‘या’ मोठ्या कंपनीसोबत झाली पार्टनरशिप
HIGHLIGHTS

Netflix चे स्वस्त प्लॅन लवकरच होणार लाँच

मात्र, हे ऍड सपोर्टिव्ह प्लॅन्स असतील

यासाठी, नेटफ्लिक्सने आता Microsoft सोबत पार्टनरशिप केली आहे.

जर तुम्हाला देखील ही तक्रार असेल की, Netflixचे प्लॅन स्वस्त नाहीत, त्यामुळे तुम्ही नेटफ्लिक्सचे लोकप्रिय शो पाहू शकत नाही, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. नेटफ्लिक्सचे स्वस्त प्लॅन लवकरच लाँच होणार आहेत. त्यासाठी, नेटफ्लिक्सने आता  Microsoft सोबत भागीदारी केली आहे. मायक्रोसॉफ्ट आता नेटफ्लिक्सचे ग्लोबल ऍडव्हर्टायझिंग टेक्नॉलॉजी आणि सेल्स पार्टनर आहे. स्वतः मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा : INFINIX च्या नवीन फोनची पहिली विक्री आज, 108MP कॅमेरा असलेला फोन रु. 16,499 मध्ये खरेदी करा…

स्वस्त प्लॅनमध्ये दिसणार जाहिराती 

कंपनीच्या ब्लॉगनुसार, नेटफ्लिक्स स्वस्त प्लॅन लॉन्च करतील, पण यासोबत तुम्हाला जाहिरातीही पाहाव्या लागतील. मायक्रोसॉफ्टच्या ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे की, नेटफ्लिक्सने आपल्या पहिल्या ऍड सपोर्ट पार्टनरची घोषणा केली आहे. नवीन आणि स्वस्त प्लॅन लाँच केल्यामुळे, अनेक लोकप्रिय शो पाहायला मिळतील. Netflix वर दिसणार्‍या सर्व जाहिराती Microsoft कडून असतील आणि एक्सक्लुसिव्ह असतील. जाहिरातीसोबतच युजर्सच्या प्रायव्हसीचीही काळजी घेतली जाईल, मात्र नवीन प्लॅनची ​​किंमत किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

नेटफ्लिक्सचे सतत नुकसान सुरु 

नेटफ्लिक्सच्या महागड्या प्लॅन्समुळे कंपनीला सतत तोटा सहन करावा लागत आहे. नेटफ्लिक्स हे देखील मान्य करतो की, त्यांचे प्लॅन्स इतरांच्या तुलनेत महाग आहेत आणि त्यामुळे नुकसान होतोय. तोटा भरून काढण्यासाठी कंपनीने काही महिन्यांपूर्वी गेमिंग सेवा सुरू केली आहे. नेटफ्लिक्स ऍपमध्ये गेमिंग टॅब दिसू लागला आहे, त्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला गेम दिसतील.

गेमसाठी ग्राहकांकडून वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. गेमिंग सेवा फक्त Netflix सबस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध असेल. नेटफ्लिक्सने म्हटले आहे की, गेमिंग दरम्यान कोणत्याही वापरकर्त्याला कोणतीही जाहिरात दाखवली जाणार नाही. नेटफ्लिक्सने आपल्या गेमिंग सेवेसह भाषेची पूर्ण काळजी घेतली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हिंदी, बांगला, पंजाबी आणि मराठी यांसारख्या भाषांमध्येही गेमिंगचा आनंद घेऊ शकता. तुम्ही भाषा न निवडल्यास, गेमची डीफॉल्ट भाषा इंग्रजी असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo