Netflix आणि Amazon प्राइम व्हिडिओचा मोफत आनंद घ्या, ‘या’ प्लॅनसह रिचार्ज करा

Updated on 08-Nov-2022
HIGHLIGHTS

Jio, Vodafone-Idea आणि Airtel प्लॅन्ससोबत OTT सब्स्क्रिप्शन मोफत

Amazon prime आणि Netflix चे मोफत सब्स्क्रिप्शन घ्या.

या प्लॅनमधून बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेऊ शकतील.

देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या Jio, Vodafone-Idea आणि Airtel त्यांच्या ग्राहकांना रिचार्ज प्लॅनसह Amazon Prime Video आणि Netflix सदस्यत्व मोफत देत आहेत. हे प्लॅन खरेदी केल्यावर तुम्हाला मोफत Amazon Prime Video सदस्यत्वाशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि फास्ट इंटरनेट सुविधा देखील मिळेल. याशिवाय, OTT प्लॅटफॉर्मचे सर्व वापरकर्ते या प्लॅनमधून बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेऊ शकतील. सर्व Amazon Prime Video सबस्क्रिप्शन पॅकेजेसबद्दल जाणून घेऊया….

हे सुद्धा वाचा : Whatsappवर फोटो पाठवताना खराब होते फोटो कॉलिटी? फक्त 'ही' एक सेटिंग करा आणि बघा मज्जा…

Jio च्या या प्लॅनमध्ये Amazon Prime आणि Netflix सबस्क्रिप्शन मोफत

 जर तुम्ही Jio चा 399 रुपयांचा प्लॅन घेतला तर तुम्हाला 75 GB डेटा तसेच Netflix आणि Amazon Prime चे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. 599 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला 100 GB डेटासह मोफत Netflix आणि Amazon Prime सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, 799 रुपयांचा प्लॅनमध्ये तुम्हाला 150 GB डेटासह मोफत Netflix आणि Amazon Prime सबस्क्रिप्शन मिळेल. 999च्या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 GB डेटा आणि मोफत Netflix आणि Amazon Prime सबस्क्रिप्शन मिळेल आणि 1,499 रुपयांचा प्लान खरेदी केल्यास तुम्हाला 300 GB डेटासह Netflix आणि Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Vodafone-Idea च्या प्लॅनमध्ये मोफत सब्स्क्रिप्शन

Vodafone-Idea (Vi) ने देखील त्यांच्या मोफत Amazon प्राइम सदस्यत्व प्लॅन्स लाँच केले आहेत. Vodafone-Idea चा 501 रुपयांचा प्लॅन घेतल्यास तुम्हाला 90 GB मासिक डेटासह Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळेल. तर मासिक अमर्यादित डेटासह रु. 701 चा पोस्टपेड प्लॅन घेतल्यावर तुम्हाला Amazon Prime आणि Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही 1,101 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन विकत घेतला तर तुम्हाला मासिक अमर्यादित डेटासह Sony Live Premium, Disney+ Hotstar आणि Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Airtel च्या या प्लॅन्सवर मोफत सबस्क्रिप्शन्स

जर तुम्ही Airtel चा 499 रुपयांचा प्लॅन 75 GB डेटासह घेतला तर तुम्हाला Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तर तुम्हाला Airtel च्या 999 च्या प्लॅनवर 100 GB डेटा सह Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तर, 1,199 रुपयांच्या प्लॅनवर 150 GB डेटा आणि 1,499 रुपयांच्या प्लॅनवर 200 GB डेटा नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिजनी + हॉटस्टारची मोफत सदस्यता मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :