Airtel च्या या प्लॅनमध्ये मिळेल OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सदस्यत्व
Jio 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय
Netflix आणि Amazon Prime हे दोन्ही OTT प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्लॅन्सची माहिती देणार आहोत, ज्यांच्या बेनिफिट्समध्ये तुम्हाला Netflix आणि Amazon Prime हे दोन्ही OTT प्लॅटफॉर्म्सचे फ्रि स्बस्क्रिप्शन मिळेल. चला तर बघुयात या प्लॅन्सची यादी…
जर तुम्हाला Netflix आणि Amazon Primeचे कमी किंमतीत सबस्क्रिप्शन हवे असेल तर हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. कारण Netflix, Amazon प्राइम सबस्क्रिप्शन फक्त 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच तुम्हाला 5G डेटा देखील दिला जातो. Amazon Prime Video 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 200GB डेटा रोलओव्हरची सुविधाही देण्यात आली आहे.
Airtelचा 1199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
Airtel 1199 पोस्टपेड प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. जर आपण OTT प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शनबद्दल बोललो, तर Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. हा प्लॅन खरेदी करून तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स मिळतात. तसेच दररोज 100 SMS दिले जातात.
VIचा 501 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
Vodafone-Idea पोस्टपेड प्लॅनच्या यादीत हा प्लॅन खूप चांगला आहे. कारण यामध्ये तुम्हाला Amazon Prime, Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन दिले जाते. मात्र, VI कोणत्याही प्लॅनमध्ये Netflix सबस्क्रिप्शन ऑफर करत नाही. पण यामध्ये तुम्हाला मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळते. यासोबतच यामध्ये 90GB डेटाही देण्यात आला आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.