अगदी निम्म्या किमतीत मिळेल Netflix सबस्क्रिप्शन! पेमेंट करण्यापूर्वी फक्त एक अट…

अगदी निम्म्या किमतीत मिळेल Netflix सबस्क्रिप्शन! पेमेंट करण्यापूर्वी फक्त एक अट…
HIGHLIGHTS

अर्ध्या किमतीत NETFLIX प्लॅन उपलब्ध

कंपनीने 100 देशांमध्ये आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत कमी केली आहे, असा दावा

कंपनीने भारत आणि दक्षिण-पूर्व आशियातील इतर बाजारपेठांमध्ये आपल्या सदस्यता प्लॅन्सच्या किंमती आधीच कमी केल्या आहेत.

Netflixबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. कमी किंमतीत सबस्क्रिप्शन घेऊ इच्छिणाऱ्या अशा यूजर्ससाठी कंपनीने एक नवीन प्लॅन आणला आहे. नवीन अहवालानुसार, कंपनीने 100 देशांमध्ये आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत कमी केली आहे, असा दावा करण्यात आला आहे. विशेषत: ज्या ठिकाणी कंपनीचे ग्राहक खूप कमी आहेत.

हे सुद्धा वाचा : Tecno चा नवा फोन लवकरच लाँच होईल, प्रत्येकाच्या बजेटमध्ये असेल का किंमत ?

 याबाबत माहिती शेअर करताना Netflixने सांगितले की, आम्ही आमची मेंबरशिप सुधारण्यासाठी नवीन मार्गांचा अवलंब करत आहोत. आम्ही आमच्या प्लॅन्समध्येही बदल करत आहोत. काही देशांमध्ये, आम्ही आमच्या प्लॅन्समध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. किंमतीतील कपातीमुळे 10 दशलक्ष ग्राहकांवर परिणाम होईल. यामध्ये व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड आणि फिलिपाइन्सच्या नावांचा समावेश आहे.

अहवालानुसार, नेटफ्लिक्स इतर देशांमध्येही आपले ग्राहक वाढवण्यासाठी, अशी योजना करू शकतात. आशिया, अमेरिका आणि मध्यपूर्वेत देखील होणार आहे. 

कंपनीने भारत आणि दक्षिण-पूर्व आशियातील इतर बाजारपेठांमध्ये आपल्या सदस्यता प्लॅन्सच्या किंमती आधीच कमी केल्या आहेत. स्ट्रीमिंग सेवेने त्याच्या सबस्क्रिप्शन प्लॅनची ​​किंमत अलीकडेच बदलली होती. आता कंपनीने त्यात पुन्हा एकदा बदल केला आहे. यानंतर एडी सपोर्टेड प्लॅन्स देखील सुरू करण्यात आले. लॉगिन करण्यापूर्वी हे महत्त्वाचे काम करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo