Myntra Refund Scam: अरे बापरे! जयपूर गॅंगने केली Myntra ची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक, वाचा डिटेल्स 

Myntra Refund Scam: अरे बापरे! जयपूर गॅंगने केली Myntra ची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक, वाचा डिटेल्स 
HIGHLIGHTS

रिफंड सर्व्हिस भारतीय ई-कॉमर्स फॅशन प्लॅटफॉर्म Myntra साठी दुःखद

जयपूरमधील एका टोळीने रिफंडच्या नावाखाली Myntraची 1.1 कोटी रुपयांची फसवणूक केली.

स्कॅमर्स ब्रँडेड शूज, कपडे आणि हँडबॅग इ. मोठ्या प्रमाणात Myntra ऍप वरून ऑर्डर करत होते.

Myntra Refund Scam: प्रसिद्ध आणि लोकप्रिय इ-कॉमर्स फॅशन प्लॅटफॉर्म Myntra बद्दल एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. आपणा सर्वांना माहितीच असेल की, या ठिकाणी ग्राहकांना रंग, फिट किंवा इतर समस्यांवर आधारित प्रोडक्ट्सची एक्सचेंज किंवा रिटर्न करून मिळतात. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, ही रिफंड सर्व्हिस भारतीय ई-कॉमर्स फॅशन प्लॅटफॉर्म Myntra साठी दुःखद ठरली. खरं तर, जयपूरमधील एका टोळीने रिफंडच्या नावाखाली कंपनीची 1.1 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे, अशी बातमी पुढे आली आहे. पाहुयात डिटेल्स-

Also Read: Realme चे इयरबड्स Myntra वर भारी Discount सह उपलब्ध, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी

‘अशा’प्रकारे Myntra ची फसवणूक

आम्ही तुम्हाला सांगतो की, ही फसवणूक या वर्षी मार्च आणि जून महिन्याच्या दरम्यान करण्यात आली आहे, असे अहवालात पुढे आले आहे. या बद्दल इ-कॉमर्स साईट Myntra ला त्यांच्या ऑडिट दरम्यान माहिती मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “स्कॅमर्स ब्रँडेड शूज, कपडे आणि हँडबॅग, सौंदर्यप्रसाधने, वॉचेस आणि दागिने यासारख्या इतर वस्तू Myntra ॲप किंवा पोर्टलवरून मोठ्या प्रमाणात ऑर्डर करत होते.”

myntra refund scam

त्यांनी पुढे सांगितले की, “त्यानंतर हे लोक पेमेंटची पद्धत म्हणून ‘ऑनलाइन’ किंवा ‘कॅश-ऑन-डिलिव्हरी COD’ पर्यायांची निवड करायचे. ऑर्डर मिळाल्यानंतर स्कॅमर्स प्रोडक्ट्सच्या कमतरतेबद्दल प्लॅटफॉर्मवर तक्रारी नोंदवून घेत आणि यानंतर ते ‘रिफंड’ पर्याय निवडत असत. लक्षात घ्या की, “जर स्कॅमर्सने ब्रँडेड शूजच्या दहा जोड्यांची ऑर्डर दिली तर पार्सल मिळाल्यानंतर, ग्राहक पार्सलमध्ये फक्त पाच पेयर्स आल्याचा दावा करत होते.” या पद्धतीने सुद्धा स्कॅमर्स Myntra कडून रिफंड घेत असावेत.

राजस्थानमधील टोळी

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील एका टोळीचा या मोठ्या फसवणुकीत सहभाग असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. कारण जवळपास सर्व ऑर्डर जयपूरमधून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर, स्कॅमर्सने ऑर्डर डिलिव्हरीसाठी बेंगळुरू आणि इतर महानगरांचे ऍड्रेस दिले होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, काही ऑर्डर टी स्टॉल, टेलर शॉप किंवा प्रोव्हिजन किंवा स्टेशनरी स्टोअर्स सारख्या व्यावसायिक आस्थापनांना डिलेव्हर करण्यात आली आहेत. या प्रकरणावर पोलीसांचा तपास सुरु आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo