OTT this week : हॉरर, कॉमेडी कंटेंटसह ‘या’ आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट आणि सीरिज

Updated on 25-May-2023
HIGHLIGHTS

कॉमेडी, हॉरर आणि इंटेन्स कंटेंटसह नवीन सिरीज

या आठवड्यात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवीन सिरीज सज्ज

Disney+Hotstar, Amazon MiniTV वर रिलीज होणारा नवा कंटेंट

 हा आठवडा OTT प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक ठरणार आहे.  नवीन आणि अप्रतिम चित्रपट आणि वेबसीरिज या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. हे शो आणि चित्रपट Hotstar, Netflix आणि Amazon Prime व्हिडिओवर रिलीज होणार आहेत.

भेडिया

भेडिया हा एक हॉरर कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. वरून धवनचा हा चित्रपट आता OTT वर रिलीजसाठी सज्ज आहे. अमर कौशिक दिग्दर्शित, हा चित्रपट अरुणाचल प्रदेशच्या जंगलात शूट करण्यात आला आहे. कृती सनोन देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपट 26 मे रोजी JioCinema वर प्रदर्शित होईल. 

सिटी ऑफ ड्रीम्स सीजन 3

गाजलेली सिरीज सिटी ऑफ ड्रीम्स पुन्हा एकदा तिसऱ्या सीझनसह परतली आहे. या सिरीजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. नागेश कुकुनूर दिग्दर्शित या राजकीय ड्रामा सिरीज च नवा सीझन बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ही सिरीज Disney+Hotstar वर 26 मे रोजी रिलीज होणार आहे. 

ये मेरी फॅमिली सिझन 2

ये मेरी फॅमिली सीझन 2 ही मंदार कुरुंदकर दिग्दर्शित मजेदार कौटुंबिक कॉमेडी ड्रामा सिरीज आहे. ही कथा खरं तर रितिकावर केंद्रित आहे, जी तिच्या आयुष्यातील अभ्यास आणि इतर आव्हानांशी संघर्ष करत असते. ही सिरीज Amazon MiniTV वर 19 मे पासून उपलब्ध झाली आहे. 

सिर्फ एक बंदा काफी है

अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित, 'सिर्फ एक बंदा कोफी है' हा खऱ्या घटनांनी प्रेरित असलेला एक इंटेन्स ड्रामा चित्रपट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी यांनी प्रामाणिक वकील पी.सी. ची भूमिका बजावली आहे. ही सिरीज 23 मे पासून Zee5 वर उपलब्ध आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :