या आठवड्यात हिंदी आणि मराठीत दोन चित्रपट प्रदर्शित होणार
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच रिलीज झालेल्या चित्रपटांची कमाई खूपच कमी आहे.
या आठवड्यात 11 नोव्हेंबर रोजी हिंदीतील संपूर्ण आठ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार
या आठवड्यात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत. चित्रपटांच्या कमाईच्या बाबतीत मागील आठवडा खूपच निराशाजनक ठरला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच रिलीज झालेल्या चित्रपटांची कमाई खूपच कमी आहे. या चित्रपटांना आधीच कमाई करणे कठीण होत असताना, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यांचा प्रवास अधिक खडतर होणार आहे. जाणून घेऊया, या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या हिंदी आणि मराठी चित्रपटांची संपूर्ण यादी…
या आठवड्यात मराठी चित्रपटसृष्टीतील दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'गोदावरी' आणि 'कुलस्वामिनी' 11 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.
हिंदीत एकाच वेळी आठ चित्रपट प्रदर्शित होणार
या आठवड्यात 11 नोव्हेंबर रोजी हिंदीतील संपूर्ण आठ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. ज्यामध्ये दोन चित्रपट एकमेकांना जबरदस्त स्पर्धा देताना दिसणार आहेत. यापैकी एक म्हणजे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची 'यशोदा' तर दुसरी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांचा 'उचाई' चित्रपट होत. कारण या दोन्ही चित्रपटांमध्ये सुपरस्टार्स आहेत. याशिवाय रितेश देशमुखचा 'मिस्टर मम्मी', तर 'अंत द एंड', 'थाई मसाज', 'रॉकेट गँग', 'करतुत' आणि 'बधाई हो बेटी हुई है' हे चित्रपट 11 नोव्हेंबरला रिलीज होत आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.