Movie Release This Week : या आठवड्यात धमाका करायला येतायेत ‘हे’ हिंदी आणि मराठी चित्रपट

Movie Release This Week : या आठवड्यात धमाका करायला येतायेत ‘हे’ हिंदी आणि मराठी चित्रपट
HIGHLIGHTS

या आठवड्यात रिलीज होणार हे धमाकेदार चित्रपट

हिंदीमध्ये सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत

तर, मराठीमध्ये तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत

सप्टेंबरचा तिसरा आठवडा चित्रपट रसिकांसाठी धमाकेदार असणार आहे. कारण संपूर्ण मनोरंजनाने भरलेले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. रणबीर कपूर-आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' हा हिंदी भाषेतील या वर्षीचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. तर या आठवड्यातही अनेक मोठे चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. धर्मेंद्र पाजी ते प्रकाश झा यांसारख्या प्रतिभावान स्टार्सचे चित्रपट या आठवड्यात हिंदीत प्रदर्शित होणार आहेत. पण यासोबतच आपल्या मराठी तसेच बॉलीवूडमध्येही अप्रतिम सिनेमे पाहायला मिळतील. या आठवड्यात कोणते सिनेमे रिलीज होणार आहेत ते बघुयात…

हे सुद्धा वाचा : नुकतेच लाँच झालेल्या Poco M5 ची ​​आज पहिली सेल, फक्त रु. 10,999 मध्ये हा फोन खरेदी करा

हिंदीमध्ये सात चित्रपट रिलीज होणार 

गेल्या आठवड्यात अभिनेता रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट रिलीज झाला. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. अशा परिस्थितीत या आठवड्यात प्रदर्शित होणारे बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करतील अशी अपेक्षा आहे. या आठवड्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील सात चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हे सातही चित्रपट 16 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमध्ये ज्येष्ठ कलाकार धर्मेंद्र स्टारर 'खली बली', 'मिडल क्लास लव्ह', 'जहां चार यार', 'मट्टू की सायकल', 'सिया', 'सरोज का रिश्ता' आणि 'धागे' हे चित्रपट रिलीज होणार आहेत.

मराठीमध्ये तीन चित्रपट रिलीज होणार 

या आठवड्यात मराठी भाषेतील तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'बॉईज 3', 'रूपनगर के चिते', 'भाऊ बली' हे 16 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर धूम ठोकणार आहेत.

हॉलिवूडमध्ये दोन चित्रपट रिलीज होणार आहेत 

या आठवड्यात हॉलिवूडचे तीन बिग बँग चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स', 'व्हेअर द क्राउडड्स सिंग' हे दोन्ही चित्रपट 16 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo