9.7-इंच डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 वर आधारित असेल Motorola Moto Tab G62, लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक
Motorola Moto Tab G62 लवकरच लाँच होणार
लाँचपूर्वीच टॅबलेटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स झाले लीक
नवीन टॅबलेटमध्ये 9.7-इंच लांबीचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता
Motorola आता नवीन टॅबलेट बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी कंपनीने टॅबलेट विभागात पुनरागमन केले होते. कंपनी एंट्री-लेव्हल आणि मिड-रेंज स्मार्टफोन्स बनवण्यासाठी लोकप्रिय आहे. कंपनीचा नवीन टॅबलेट Moto Tab G62 मिड-रेंज कॅटेगरीमध्ये उत्कृष्ट फीचर्ससह दिसला, परंतु टॅबलेटच्या लाँच आणि उपलब्धतेबाबत अद्याप माहिती पुढे आलेली नाही. चला तर जाणून घेऊयात या आगामी टॅबलेटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स…
आगामी Motorola Tab G62 डिव्हाइसचे काही प्रमुख फीचर्स Google Play Console लिस्टिंगवर आहेत. टॅबलेट 1200 x 2000 पिक्सेल स्क्रीन रिझोल्यूशन देणाऱ्या डिस्प्लेसह येईल. हे Motorola Tab G62 सारखेच रिझोल्यूशन आहे. परंतु Tab G70 च्या 11-इंच स्क्रीनऐवजी, नवीन टॅबलेटमध्ये 9.7-इंच लांबीचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : 5000mAh बॅटरीसह Oppoचा नवीन फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स
प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस फक्त Wi-Fi मॉडेल साठी Qualcomm Snapdragon 678 वर आधारित असेल, तर 4G LTE मॉडेल Qualcomm Snapdragon 665 प्रोसेसर वर आधारित असेल, दोन्ही जवळपास 3 वर्षे जुन्या चिप्स आहेत. टॅबलेट 4GB RAM सह येण्याची अपेक्षा आहे.
Motorola Tab G70 LTE
Motorola Tab G70 LTE मध्ये 11.00-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2000×1200 पिक्सेल आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर ते MediaTek Helio G90T वर काम करते. या टॅबलेटमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच, या टॅबलेटच्या मागील बाजूस 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. याव्यतिरिक्त यामध्ये 7,700mAh बॅटरी देण्यात आली आहे.
येत्या आठवड्यात Motorola Moto Tab G62 टॅबलेटबद्दल फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि उपलब्धता यासह अधिक माहिती मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile