MOTOROLAने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भारतात Moto Tab G70 लाँच केला होता आणि आता टॅबलेटच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात झाली आहे. नवीन किंमतीसह कंपनीच्या साइटवर Moto Tab G70 पाहिला जाऊ शकतो. Moto Tab G70 जानेवारी 2022 मध्ये 21,999 रुपयांच्या किमतीत सादर करण्यात आला होता.
हे सुद्धा वाचा : Samsung चा 75,000 रुपयांचा फोन थेट 30,000 मध्ये खरेदी करा, ग्राहकांची होणार मोठी बचत
वर सांगितल्याप्रमाणे, Moto Tab G70 जानेवारी 2022 मध्ये 21,999 रुपयांच्या किमतीत सादर करण्यात आला होता. त्यानंतर या टॅबलेटच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात झाली आहे. याबरोबरच, आता या टॅबलेटची किंमत 19,999 रुपये आहे. टॅबलेट मॉडर्निस्ट टील कलरवे रंगात खरेदी केला जाऊ शकतो.
Moto Tab G70 मध्ये Android 11 देण्यात आला आहे. यात 2000×1200 पिक्सेल रिझोल्यूशनसह 11-इंच लांबीचा IPS 2K डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 400 nits आहे. लो ब्लु लाईटसाठी टॅबला TUV राईनलँड सर्टिफिकेट मिळाले आहे. यात MediaTek Helio G90T प्रोसेसरसह 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने वाढवता येते.
मोटोरोलाच्या या टॅबमध्ये डॉल्बी ATMOS ला सपोर्ट असलेले चार स्पीकर आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी टॅबमध्ये 4G LTE, Wi-Fi GPS, GLONASS, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth v5.2 आणि USB Type-C पोर्ट आहे. Moto Tab G70 मध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील समर्थित असेल. यात 20W टर्बोपॉवर चार्जिंगला सपोर्ट असलेली 7700mAh बॅटरी आहे.
मोटोरोलाच्या या टॅबमध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. एक 8-मेगापिक्सेल कॅमेरा समोर उपलब्ध असेल, ज्याचा अपर्चर f/2.0 आहे. टॅबमध्ये Google Kids Space असेल, ज्यामध्ये शिक्षकांनी निवडलेल्या 10,000 हून अधिक ऍप्स आहेत. टॅबसह गुगल प्ले-स्टोअरचाही सपोर्ट असेल.