Motorola ने आपला नवीन टॅबलेट Moto Tab G62 LTE गेल्या आठवड्यात भारतात लाँच केला. 10.6-इंच लांबीचा डिस्प्ले आणि 7700mAh बॅटरी असलेल्या या टॅबची सेल आजपासून सुरू झाली आहे. 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या टॅबची किंमत 17,999 रुपये आहे. टॅब फक्त ग्रे कलर ऑप्शनमध्ये येतो आणि तुम्ही तो फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. कंपनी या टॅबवर 5% कॅशबॅक देखील देत आहे. कॅशबॅकसाठी, तुम्हाला फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डने पैसे द्यावे लागतील. याशिवाय टॅब खरेदी करणाऱ्या युजर्सना ऑफरमध्ये 3 महिन्यांसाठी YouTube Premium चे मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. येथून खरेदी करा…
हे सुद्धा वाचा : OTT This Week : या आठवड्यात लव्ह आणि क्राइमचा डबल धमाका, हे चित्रपट-सिरीज OTT वर होणार रिलीज
टॅबमध्ये कंपनी 2K रिझोल्यूशनसह 10.61 इंच IPS LCD पॅनेल ऑफर करत आहे. टॅबमध्ये दिलेल्या या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 5:3 आहे आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. 4G कनेक्टिव्हिटी असलेला हा टॅब 4 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. तुम्हाला मायक्रो SD कार्डच्या मदतीने त्याची मेमरी देखील वाढवता. प्रोसेसर म्हणून त्यात स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आहे.
फोटोग्राफीसाठी टॅबमध्ये कंपनी 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देत आहे. सेल्फीसाठी यात फक्त 8-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. Moto Tab G62 LTE 7700mAh च्या पावरफुल बॅटरीसह येतो. टॅबमध्ये दिलेली ही बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या मोटो टॅबचे वजन 465 ग्रॅम आहे.