7700mAh बॅटरीसह Moto Tab G62 LTE ची सेल सुरू, तीन महिन्यांसाठी YouTube Premium मोफत
Moto Tab G62 LTE ची सेल आजपासून सुरू
नवीनतम टॅबची किंमत 17,999 रुपये
हा टॅब तुम्हाला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल
Motorola ने आपला नवीन टॅबलेट Moto Tab G62 LTE गेल्या आठवड्यात भारतात लाँच केला. 10.6-इंच लांबीचा डिस्प्ले आणि 7700mAh बॅटरी असलेल्या या टॅबची सेल आजपासून सुरू झाली आहे. 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या टॅबची किंमत 17,999 रुपये आहे. टॅब फक्त ग्रे कलर ऑप्शनमध्ये येतो आणि तुम्ही तो फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. कंपनी या टॅबवर 5% कॅशबॅक देखील देत आहे. कॅशबॅकसाठी, तुम्हाला फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डने पैसे द्यावे लागतील. याशिवाय टॅब खरेदी करणाऱ्या युजर्सना ऑफरमध्ये 3 महिन्यांसाठी YouTube Premium चे मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. येथून खरेदी करा…
हे सुद्धा वाचा : OTT This Week : या आठवड्यात लव्ह आणि क्राइमचा डबल धमाका, हे चित्रपट-सिरीज OTT वर होणार रिलीज
Moto Tab G62 LTE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
टॅबमध्ये कंपनी 2K रिझोल्यूशनसह 10.61 इंच IPS LCD पॅनेल ऑफर करत आहे. टॅबमध्ये दिलेल्या या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 5:3 आहे आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. 4G कनेक्टिव्हिटी असलेला हा टॅब 4 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. तुम्हाला मायक्रो SD कार्डच्या मदतीने त्याची मेमरी देखील वाढवता. प्रोसेसर म्हणून त्यात स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आहे.
फोटोग्राफीसाठी टॅबमध्ये कंपनी 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देत आहे. सेल्फीसाठी यात फक्त 8-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. Moto Tab G62 LTE 7700mAh च्या पावरफुल बॅटरीसह येतो. टॅबमध्ये दिलेली ही बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या मोटो टॅबचे वजन 465 ग्रॅम आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile