Monohum ने एक असा स्मार्टफोन लाँच केला आहे, जो गोलाकार आहे. अशा आकाराचा स्मार्टफोन येणे हे सध्याचा आयताकार स्मार्टफोन्स अलविदा करण्याचे संकेत आहे का?
जर तुम्ही एक अशा स्मार्टफोन्सच्या शोधात आहात, जो गर्दीत सर्वांपेक्षा वेगळा दिसेल, तर आपण आयफोन्स आणि गॅलेक्सी S7 चा विचार करणे सोडून द्या. कारण बाजारात एक असा स्मार्टफोन येतोय, जो एका वेगळ्या आकाराच्या स्मार्टफोनची एक नवीन व्याख्या लिहेल. ह्या स्मार्टफोनला नुकत्याच आलेल्या Monohm कंपनीने लाँच केले आहे आणि ह्याचे नाव आहे Runcible. हा स्मार्टफोन आपल्या सर्क्युलर डिझाईनने बनलेला आहे. आणि ह्या स्मार्टफोनने मोबाईल जगताला हलवून सोडले आहे. ह्या स्मार्टफोनला आपण प्री-ऑर्डर करु शकता. हा दोन प्रकारात मिळेल. ह्याची किंमत ३९९ डॉलर म्हणजेच जवळपास २६,८०० रुपये आणि दुस-या प्रकाराची किंमत ४९९ डॉलर म्हणजेच ३३,५०० रुपये आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 2.5 इंचाची गोल स्क्रीन दिली आहे, ज्याचे पिक्सेल रिझोल्युशन 640×640 पिक्सेल आहे. ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर 1GB रॅमसह दिला आहे. ह्यात आपल्याला 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. ह्यात 7MP चा रियर कॅमेरा दिला आहे, जो स्मार्टफोनच्या मध्यभागी आहे. हा कंपनीच्या BuniOS सह अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. हा स्मार्टफोन मोबाईल जगतात एक नवा इतिहास लिहेल.