मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4 मध्ये काय आहे खास?

मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 4 मध्ये काय आहे खास?
HIGHLIGHTS

हा डिवाईस लॅपटॉपला रिप्लेस करु शकतो, असा मायक्रोसॉफ्टला विश्वास आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विंडोज फोनचा बोजवार उडाल्यामुळे आणि त्याच्या सरफेस कारणामुळे मायक्रोसॉफ्टला कोणी गंभीरपणे घेत नव्हते. पण मागील महिन्यात कीनोटच्या घोषणेनंतर आपण थोडे प्रभावित झालो. कारण तेव्हा ना केवळ सरफेस प्रो 4 लाँच केला गेला तर त्यासोबत, सरफेस बुक, 950 XL आणि होलोलेन्ससुद्धा लाँच केले गेले.

 

गुरुवारी मुंबईत झालेल्या #FutureUnleashed कार्यक्रमात मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी पुढील वर्षी जानेवारीत सरफेस प्रो 4 भारतीय बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. तसा ह्याला थोडा उशीरच झाला, पण तरीही ते आपण नक्की घेऊ. आम्ही सर्वच थोडे आश्चर्यचकित झालो होतो, की टॅबलेट लॅपटॉपची जागा कशी काय घेईल? पण आमचे नशीब चांगले होते, की ह्या कार्यक्रमात हा लॅपटॉप हाताळण्यासाठी एक वेगळी जागा बनविण्यात आली होती, जेथे आम्ही काही मिनिटांसाठी का होईना पण  हा हाताळू शकलो. पण त्यात आम्हाला अगदी सविस्तर नाही पण थोडीफार माहिती नक्कीच मिळाली.

सरफेस प्रो 4 चा अनुभव:

जेव्हा आम्ही हा हातात घेतला तेव्हा ह्याचे टाइप कव्हर कीबोर्डचे फ्लॅप बंद होते. जेव्हा आम्ही ते उघडले आम्हाला लॉक स्क्रीन दिसली.त्या डिवाइसशी जोडलेल्या व्यक्तीचे खाते पाहिल्यानंतर त्यावर आम्हाला मायक्रोसॉफ्ट हॅलो दिसले. त्या सरफेस प्रोमध्ये इनफ्रारेड ब्लास्टर पाहिले जे तुमच्या डोळ्यांना स्कॅन करतो आणि मग तुमचे डिवाईस अनलॉक्ड होते. पण केवळ एक उत्सुकता म्हणून आम्ही त्या व्यक्तीला त्याचे डोळे बंद करण्यास सांगितले, आणि परिणाम पाहिला, पण खरच त्याचे काम बंद झाले.

जेव्हा तो डिवाईस तुम्ही तुमच्या हातात घेता तेव्हा तुम्हाला पहिली गोष्ट दिसते ते म्हणजे सरफेस पेन. त्याच्या उभ्या कडांवर चुंबकीय धातू आहे, त्यामुळे तुम्ही ते त्वरित ओढा आणि मग ते स्क्रीनवर वापरुन पाहा. त्याच्या वरच्या बाजूस अंगठ्याने क्लिक केल्यावर तेथे खोडरबरही दिसेल. एकदा क्लिक केल्यावर तुम्ही वायरशिवाय वननोट उघडू शकता, दोनदा क्लिक केल्यावर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि खूप वेळ दाबून ठेवल्यास कोर्टाना उघडतो. तेथे कॅलिब्रेशन, वातावरणीय आवाजा आणि इंटरनेट कनेक्शन अशा समस्या होत्या पण कोर्टानाने त्या विनंत्यांना नकार दिला. पण हे काही मोठं नुकसान नाही. कारण ह्याआधीही असे कोर्टाना अयशस्वी झाले होते.

सरफेस पेन पाहिल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, हा पेन कीबोर्डप्रमाणेच काम करतो. त्याचा स्पर्श केल्याचा अनुभव चांगला आहे, त्याचे कारण म्हणजे ह्यात की ट्रॅवल जोडलेले आहे. आम्हाला असे वाटत नाही की, कोणीही ह्याच्या चिकलेट लेआऊटबाबत तक्रार करेल कारण त्यात योग्यरित्या जागा सोडण्यात आली आहे. फक्त एकच खटकणारी गोष्ट म्हणजे ह्याचा  संपूर्ण कीबोर्ड झुकलेला असल्यामुळे टाईपिंग थोडी जोरात करावी लागते.  

त्याला असलेले किकस्टॅड तुम्ही स्क्रीनच्या कोनाप्रमाणे हवे तसे अॅडजस्ट करु शकता. हे जवळपास मागील सर्व बाजूस फिरवता येते. माझा असा अंदाज आहे की, तो १६० अंशात असू शकतो. हा टॅबलेेट डेस्कवर ठेवून वापरण्यास अगदी सोयीस्कर आहे, पण मांडीवर ठेवून वापरण्यास हा सोयीस्कर नाही. अद्याप तरी आम्ही तसा प्रयत्न केला नाही. मात्र त्यात वापरलेली पिक्सेल C चुंबकीय पद्धतीमुळे कदाचित असे होत असावे. फक्त सरफेस प्रो 4 ची बांधणी उत्कृष्ट असल्याची वाटते. त्याला असलेले मॅग्नेशियम कव्हर हे दिसायला चांगले आणि त्याचप्रमाणे त्याचा स्पर्श सुद्धा चांगला वाटतो. ह्यात कोणत्या प्रकारचे हार्डवेअर वापरण्यात आले आहे? हे सहाव्या जेन कोअर m3, i5 किंवा i7 CPU ने शक्तीशाली बनविण्यात आले असून तुम्हाला हवा तो पर्याय निवडल्यानंतर त्याचे रॅम 4GB पासून 16GB पर्यंत वाढवता येते. हे सर्वकाही ७६६ ते ७८६ ग्रॅममध्ये एकत्रित करण्यात आले आहे, जे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे असल्याचे वाटते.

ह्याला १२.३ इंचाचा पिक्सेल सेन्स टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. जो अतिशय उठावदार दिसतो. पण तो थोडा परावर्तितसुद्धा आहे. ह्याचे रिझोल्युशन 2736×1824 आहे, ज्याची 267ppi इतकी पिक्सेल तीव्रता मिळते. आम्ही ह्यावर 4K व्हिडियो खेळलो पण त्यात आम्हाला कोणतीच अडचण आली नाही. आणि त्याचा व्हिडियोही चांगला दिसतो. ह्याच्या स्पीकरचा आवाज खूप मोठा आहे.

Siddharth Parwatay

Siddharth Parwatay

Siddharth a.k.a. staticsid is a bigger geek than he'd like to admit. Sometimes even to himself. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo