मायक्रोमॅक्स सरफेस प्रो 3 टॅबलेटच्या किंमतीतही झाली घसरण, ५८,९९० रुपयात उपलब्ध

Updated on 16-Mar-2016
HIGHLIGHTS

लाँचच्या वेळी मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 3 ला ७३,९९० रुपयात सादर केला गेला होता. मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 3 ला 2014 मध्ये सादर केले गेले होते आणि हा कोर i3, i5 आणि i7 प्रोसेसर पर्यायात उपलब्ध आहे.

मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो टॅबलेटच्या किंमतीत जबरदस्त घसरण झाली आहे. आता हा टॅबलेट अॅमेझॉन इंडियावर ५८,९९० रुपयाच्या किंमतीत उपलब्ध आहे. मात्र कंपनीने सांगितले आहे की, ही ऑफर काही काळापुरताच मर्यादित आहे. तथापि कंपनीने ही ऑफर कधीपर्यंत आहे हे सांगितलेले नाही.

लाँचच्या वेळी मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 3 ला ७३,९९० रुपया सादर केला गेला होता. मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 3 ला 2014 मध्ये सादर केले गेले होते आणि हा कोर i3, i5 आणि i7 प्रोसेसर पर्यायात उपलब्ध आहे.

मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 3 टॅबलेटमध्ये 12 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2160×1440 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा डिवाइस 4GB रॅम आणि 128GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. तथापि, हा डिवाइस एक टाइप कवरसह येतो आणि ह्या वैशिष्ट्यामुळे हा सरफेस प्रो 3 दुस-या डिवाईसपेक्षा वेगळा आहे. ह्याच्या टाइप कव्हरच्या मदतीने हा डिवाइस एक लॅपटपमध्ये बदलू शकतो आणि ह्याला खूप सहजपणे वापरु शकतो.

हेदेखील पाहा – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू Video

त्याचबरोबर सरफेस प्रो 3 ला एक स्टायलससह सुद्धा वापरु शकतो. त्याला सरफेस पेनचे नाव दिले गेले आहे. तथापि, आपल्याला हा टाइप कव्हर आणि सरफेस पेनला वेगवेगळे खरेदी करावे लागेल.

हेदेखील वाचा – सोनी प्लेस्टेशन VR: 399 डॉलर किंमतीसह ऑक्टोबरमध्ये होणार लाँच

हेदेखील वाचा – २१,००० च्या किंमतीत येणारे हे आहेत दोन उत्कृष्ट टॅबलेट्स

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :