मायक्रोमॅक्सने भारतात आपला नवीन टॅबलेट लाँच केला आहे, ह्या टॅबलेटचे नाव आहे मायक्रोमॅक्स कॅनवास टॅब P702. ह्याला एक ई-कॉमर्स वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे. कंपनीने ह्याला आपल्या स्वत:च्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केले आङे. तथापि, आता मायक्रोमॅक्सने ह्या टॅबची अधिकृतरित्या घोषणा केली नाही. ह्याची किंमत ह्याच्या लिस्टनुसार ७,९९९ रुपये आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास टॅब P702 ड्यूल सिम सपोर्ट करणार टॅब आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. ह्या टॅबमध्ये आपल्याला 7 इंचाची HD 1280×720 पिक्सेलची IPS डिस्प्ले मिळत आहे. ह्यात 1.3GHz चे क्वाड-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 2GB रॅम यांचा समावेश आहे.
ह्याच्या अंतर्गत स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस LED फ्लॅशसह आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे.
ह्याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्यात 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ आणि मायक्रो-USB सपोर्ट मिळत आहे. हा आपल्याला स्नॅपडिलच्या माध्यमातून अगदी सहजपणे मिळेल. त्याचबरोबर ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीनुसार 250 तासांचा स्टँडबाय आणि 3 तासांचा प्लेटाइम देण्यास सक्षम आहे.
ह्याआधी कंपनीने आपला एक फॅबलेट भारतीय बाजारात आणला होता, ज्याचे नाव होते मायक्रोमॅक्स कॅनवास फँटाबुलेट. ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्याला ६.९८ इंचाच्या डिस्प्लेसह बाजारात आणले आहे. त्याच्या ह्या किंमतीमुळे तसेच त्याच्या उत्कृष्ट स्क्रीनमुळे हा स्मार्टफोन लेनोवोच्या फॅब प्लसला कडक टक्कर देणार आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाची डिस्प्ले दिली आहे. ह्याची किंमत २०,९९० रुपयाच्या जवळपास आहे आणि ऑक्टोबरमध्ये भारतात लाँच केला गेला होता.
मायक्रोमॅक्सच्या ह्या फँटाबुलेट स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ६.९८ इंचाची HD 720×1280 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 1GB चे रॅम दिले गेले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर चालणा-या ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा LED फ्लॅशसह दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात 2 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ड्यूल-सिम सपोर्ट करणा-या ह्या फँटाबुलेटमध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स
हेदेखील वाचा – LG G5 च्या किंमतीचा झाला खुलासा, प्री-बुकिंगही झाली सुरु