Merry Christmas 2024 Wishes: प्रियजनांना WhatsApp वर नाताळच्या मराठीतून द्या हटके शुभेच्छा, ‘अशा’प्रकारे AI द्वारे बनवा इमेजेस, स्टिकर्स
आज 25 डिसेंबर रोजी अगदी जोमात प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवस म्हणजेच 'ख्रिसमस डे' आहे.
या दिवशी गोड शुभेच्छा आणि सॅन्टा क्लॉज बनून गिफ्ट्स दिले जातात.
WhatsApp वर मेटा AI द्वारे तयार करा फोटोज आणि स्टिकर्स
Merry Christmas 2024 Wishes: नेहमीप्रमाणे या वर्षी आज 25 डिसेंबर रोजी अगदी जोमात प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवस म्हणजेच ‘ख्रिसमस डे’ साजरा करण्याची तयारी सुरु झाली आहे. मराठीत ख्रिसमसच्या सणाला नाताळ असे म्हटले जाते. चर्च, मॉल्स, शाळा, कॉलेज इ. ठिकाणी तर काहींच्या घरी ख्रिसमस ट्री सजवण्यात आले आहेत. या दिवशी गोड शुभेच्छा आणि सॅन्टा क्लॉज बनून गिफ्ट्स दिले जातात, अशाप्रकारे हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तुम्हाला देखील आपल्या प्रियजनांना मित्र मैत्रिणीला नाताळच्या मराठीतून शुभेच्छा द्यायच्या असतील तर, हा लेख खास तुमच्यासाठी आहे.
WhatsApp वर प्रियजनांना मराठीत द्या नाताळच्या शुभेच्छा
- आला नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा, सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
- गरिबांना मदत करून भेटवस्तू द्या, त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित पाहून ख्रिसमस बनवा खास, नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
- प्रेम, सत्य, दया, संदेश देणारा नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- होउ दे तुमच्यावर सुखाची उधळण! तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना, ख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!
- तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण, ख्रिसमसला हमखास येते. आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!
- ना कार्ड पाठवत आहे, ना फूल पाठवत आहे. फक्त खऱ्या मनाने ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे. ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा!
- तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!
- ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि
नववर्षही छान जाओ. मेरी ख्रिसमस! - प्रभूचा आशीष अवतरला नव साज घेऊनी, आता द्या आणि घ्या प्रेमच प्रेम भरभरुनी, नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
- नाताळ सण घेऊन आला मोठा आनंद, सर्वत्र होवू दे सुखसमृद्धीची बरसात. जगात मानवता हाच धर्म खास
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा! - या नाताळच्या सणाला तुमचं जीवन ख्रिसमस ट्रीप्रमाणे हिरवंगार आणि भविष्य चांदण्यंप्रमाणे चमचमणारं राहो. मेरी ख्रिसमस!
- ख्रिसमसचा हा सण प्रेमाचा आणि आशेचा, तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रवाह वाहो, येशूचा प्रकाश तुमच्या जीवनाला मार्गदर्शक ठरो, ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
- आनंदाने साजरा करा ख्रिसमसचा पवित्र सण, कारण तारणहाराचा जन्म झाला आहे, प्रेम, शांती आणि सुख सदैव तुमच्यासोबत राहो, ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
- तुमच्या हृदयात विश्वास आणि आशेचा दीप पेटवू दे, ख्रिसमसचा सण तुमच्या जीवनात गोडवा आणो, तुमचं भविष्य तेजस्वी आणि आनंदमय होवो, ख्रिसमसच्या शुभेच्छा!
- प्रेम आणि प्रकाशाचा ख्रिसमसचा सण घेऊन येतो, तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण उत्सवासारखा असो, येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो, मेरी ख्रिसमस!
- गोड गोड क्षणांनी ख्रिसमसचा उत्सव साजरा करा, येशूच्या प्रेमाने तुमचं हृदय गोडसर होवो, तुमच्या आयुष्यात सुखाचा आणि शांतीचा वास असो, मेरी ख्रिसमस!
- येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद घ्या, प्रेम, शांती, आणि आनंद तुमच्या घरात नांदो, सुख आणि समाधान तुमच्या जीवनात फुलू दे, ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा!
- आला सांताक्लॉज घेऊन शुभेच्छा हजार, चिमुकल्यांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार, तुमच्यासाठीही खास होवो हा आनंदाचा सण वारंवार, ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा!
- सारा आनंद, सगळं सौख्य, होवो तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता, यशाची सारी शिखरं, ऐश्वर्य हे तुम्हांला मिळो याच नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
WhatsApp वर मेटा AI द्वारे तयार करा फोटोज आणि स्टिकर्स
- Meta AI द्वारे इमेजेस, स्टिकर्स तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करावे लागेल.
- यानंतर चॅट्सच्या पुढे दिसणाऱ्या ब्लू सर्कल मेटा AI आयकॉनवर क्लिक करा.
- आता मेटा AI चॅटमध्ये AI स्टिकर्स व्युत्पन्न करण्यासाठी प्रॉम्प्ट करा. उदा. ‘Create Merry Christmas Stickers’.
- या प्रॉम्प्टनंतर, तुम्हाला WhatsApp चे अनेक नवीन AI जनरेट केलेले ख्रिस्तमस स्टिकर्स दिसतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात बदल देखील करू शकता.
- तुम्ही ही इमेजेस आणि स्टिकर्स डाउनलोड करून तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना WhatsApp वर पाठवू शकता.
वर नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून, तुम्ही तुमची कल्पना प्रत्यक्षात आणून विविध प्रकारचे ख्रिसमस स्टिकर्स तयार करू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile