25 डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसानिमित्ताने ख्रिसमस डे साजरा केला जातो.
भारतात केवळ ख्रिश्चन धर्मीयच नाही तर सर्व सर्व धर्मांचे लोक हा सण साजरा करतात.
ख्रिसमसनिमित्त प्रियजनांना WhatsApp वर द्या अप्रतिम शुभेच्छा
Merry Christmas 2024 Wishes: दरवर्षी 25 डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसानिमित्ताने ख्रिसमस डे म्हणजेच नाताळचा सण साजरा केला जातो. भारतात केवळ ख्रिश्चन धर्मीयच नाही तर सर्व धर्मांचे लोक हा सण साजरा करतात. या सणानिमित्त केवळ चर्चमध्येच नाही तर ठिकठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले जातात. ख्रिसमसला सॅन्टा क्लॉज बनून गिफ्ट देऊन शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. तुम्ही देखील आपल्या प्रियजनांना WhatsApp वर मराठीतू शुभेच्छा द्या.
आम्ही तुमच्यासाठी अप्रतिम शुभेच्छांची यादी तयार केली आहे. या शुभेछांद्वारे तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंब आणि मित्र परिवारासह हा सण साजरा करा. शुभेच्छा पुढीलप्रमाणे:
मदर मेरीच्या पोटी जन्मला येशू बाळ, आनंद दिला जगाला, साजरा होतोय नाताळ. ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार, लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार. ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
सांता तुम्हाला आनंद, समृद्धी आणि कीर्ती घेऊन येवो. किमान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. ख्रिसमसच्या शुभेच्छा!
आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र, सुख, समृद्धी घेऊन येवो. आनंद नेहमीच द्विगुणीत होवो, ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
ख्रिसमस म्हणजे प्रेम, ख्रिसमस म्हणजे आनंद, ख्रिसमस हा उत्साह आहे, ख्रिसमस हा नवीन उत्साह आहे. तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रेम, आनंद व समृद्धीने भरलेल्या आनंददायी ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस
नाताळाचा सण, सुखाची उधळण, मेरी ख्रिसमस! तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.
सगळं दुःख विसरून या ख्रिसमला करा सांताचं स्वागत. तुझ्या आयुष्यात नक्कीच येईल आनंदाचं नव जग.
ना कार्ड पाठवत आहे, ना फूल पाठवत आहे, फक्त सच्च्या दिलाने तुला ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.
ख्रिसमसची जादू तुमचे हृदय आणि घर शांती, प्रेम आणि आनंदाने भरेल. ख्रिसमसच्या शुभेच्छा!
ख्रिसमसच्या शुभेच्छा! या ऋतूत तुमचे हृदय हलके होवो, तुमचे संकट कमी असू दे आणि तुमचा आनंद अमर्याद असू दे. मेरी ख्रिसमस
अशाप्रकारे डाउनलोड करा Status साठी Video
तुम्हाला देखील नाताळनिमित्त WhatsApp वर तुम्हाला आवडलेला सोशल मीडिया (YouTube, Instagram) वरील Video डाउनलोड करून स्टेटसला ठेवायचा असेल तर, पुढील सोपी प्रक्रिया पहा:
सर्वप्रथम तुम्हाला आवडलेल्या व्हीडिओची लिंक कॉपी करा.
त्यानंतर, गुगल सर्चवर जाऊन ‘यु-ट्यूब व्हीडिओ फ्री डाउनलोड’ किंवा ‘इंस्टाग्राम व्हीडिओ फ्री डाउनलोड’ असे सर्च करा.
त्यांनतर तुम्हाला स्क्रीनवर फ्री व्हीडिओ डाउनलोड करण्यासाठी अनेक साईट्स दिसतील.
योग्य अशा साईटवर क्लिक करा. येथे तुम्हाला व्हीडिओ लिंक पेस्ट करण्याचे पर्याय दिसेल.
तुम्ही निवडलेल्या व्हीडिओची लिंक पेस्ट करा आणि डाऊनलोडवर क्लिक करा.
अशाप्रकारे तुम्हाला आवडलेला व्हीडिओ डाउनलोड होईल आणि फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. त्यांनतर तुम्ही हा व्हीडिओ WhatsApp स्टेटसवर ठेऊन Christmas 2024 निमित्त शुभेच्छा प्रियजनांना देऊ शकता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.