कांग्रेस च्या उपस्थितीत Facebook चे चीफ Mark Zuckerberg ने सोशल नेटवर्क वर प्राइवेट डेटा सुरक्षित न ठेवण्याची आपली चुक स्विकारली. लिखित स्वरुपात Zuckerberg बोलला, “आम्ही आपली जबाबदारी पूर्ण केली नाही, जी एक मोठी चुक आहे. ही माझी चुक आहे आणि यासाठी मी माफी मागतो. मी Facebook ला सुरू केले आहे, मी याला चालवतो आणि इथे जे काही होते त्यासाठी मी जबाबदार आहे.“
Zuckerberg मंगळवारी सीनेटर्स च्या समोर आपली बाजू मांडेल आणि बुधवारी हाउस पॅनल मध्ये साक्ष देईल की Facebook यूजर्स चा पर्सनल डाटा Donald Trump च्या कँपेन सह काम करणार्या ब्रिटिश कंपनी Cambridge Analytica पर्यंत कसा पोहोचला. Zuckerberg ने आपल्या लिखित विधानात लिहिले आहे की “Facebook एक आदर्शवादी आणि आशावादी कंपनी आहे आणि आम्ही लोकांना जोडण्याचे चांगले काम करत आहोत.“
त्याने हे पण स्वीकारले आहे की त्यांनी अशा प्रकारच्या नुकसाना पासून वाचण्यासाठी पुरेसे काम केले नाही. ज्यात खोट्या बातम्या, निवडणुकीच्या वेळी बाहेरील हस्तक्षेप, आणि डेटा प्राइवेसी इत्यादीचा समावेश आहे. Zuckerberg ने Facebook द्वारा घोषित की लिस्ट मध्ये त्या स्टेप्स पण सांगितल्या आहेत ज्यांचा वापर थर्ड पार्टी Cambridge Analytica इत्यादी साठी डेटा चा अनुचित वापर करण्यासाठी केला गेला होता आणि त्यांचा तपास पण केला जात आहे.
Zuckerberg हे पण बोलला की, “लोकांना आवाज देने पुरे नाही तर याची पण काळजी घेतली गेली पाहिजे की लोक दुसर्यांना त्रास देण्यासाठी याचा वापर करू शकणार नाहीत. लोकांना त्यांच्या डेटा चा कंट्रोल देणे पुरेसे नाही पण डेवलपर्स नी पण याची काळजी घेतली पाहिजे.“