तंत्रज्ञानाच्या विश्वात Ratan Tata यांच्या टाटा समूहाच्या कंपन्यांचा दबदबा, जाणून घ्या सविस्तर डिटेल्स 

तंत्रज्ञानाच्या विश्वात Ratan Tata यांच्या टाटा समूहाच्या कंपन्यांचा दबदबा, जाणून घ्या सविस्तर डिटेल्स 
HIGHLIGHTS

Tata Group of companies चे विविध क्षेत्रांव्यतिरिक्त तंत्रज्ञान उद्योगातही आघाडीवर आहेत.

Tata समूहाच्या टेक कंपन्या जागतिक स्तरावर कार्यरत आहेत.

Tata Electronics भारतात iPhone ची निर्मिती करत आहे.

दिग्गज TATA Groups चे अध्यक्ष Ratan Tata यांच्या निधनामुळे केवळ देशातच नाही तर अख्ख्या जगात शोककळा पसरली आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. Tata Group of companies चे विविध क्षेत्रांव्यतिरिक्त तंत्रज्ञान उद्योगातही आघाडीवर आहेत. टेक विश्वात देखील सर्वत्र TATA समूहाच्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. टाटा समूहाच्या अनेक कंपन्या तंत्रज्ञान, दूरसंचार, एरोस्पेस, संरक्षण आणि ई-कॉमर्स क्षेत्रात काम करतात. जाणून घेऊयात सविस्तर-

टेक विश्वात TATA Groups चे मोठे योगदान

आपण सर्वांना माहितीच आहे की, टाटा समूहाच्या टेक कंपन्या जागतिक स्तरावर कार्यरत आहेत. या कंपन्यांचे नेतृत्व TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस करतात. विविध टेक सेवा पुरवण्यासोबतच या कंपन्या बाजारात येणाऱ्या नवीन प्रोडक्ट्समध्ये वेगळे नावीन्य आणण्याचे काम देखील करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, जगभरातील अनेक उत्तम टेक्नॉलॉजी कन्सल्टंट टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मध्ये कार्यरत आहेत.

ratan tata,ratan tata news,ratan tata passes away,ratan tata death,ratan tata family,ratan tata death news,

TATA Groups चे यश

Tata Technologies चे नाव 28 नोव्हेंबर 2023 रोजी भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंजमध्ये समाविष्ट करण्यात आले. Tata Digital ने एप्रिल 2022 मध्ये Tata Neu ॲप लाँच केले. हे ॲप सर्व श्रेणींसाठी उपलब्ध फायदे देते. हे देशातील पहिले सुपर ॲप आहे.

याव्यतिरीक्त, TATA Elxsi ही टाटाची ग्लोबल डिझाइन आणि टेक्नॉलॉजी सर्व्हिस देणारी शाखा आहे. टाटा टेलिसर्व्हिसेसकडे एंटरप्रायझेससाठी ICT Solutions चा मजबूत पोर्टफोलिओ आहे. त्याचे फायबर ऑप्टिक नेटवर्क 130,000 किलोमीटर पसरलेले आहे आणि 60 हून अधिक भारतीय शहरांमध्ये कार्यरत आहे.

त्याबरोबरच, Tata Electronics या टाटा समूहाच्या कंपनीने गुजरातमधील धोलेरा येथे भारतातील पहिले सेमी कंडक्टर फॅब स्थापन करण्याची घोषणा केली आहे. टाटा समूह गेल्या अनेक दशकांपासून भारतीय सशस्त्र दलांसाठी ‘मेड इन इंडिया’ पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम करत आहे. भारताच्या खाजगी क्षेत्रातील संरक्षण उद्योगातील हा सर्वात मोठा खेळाडू मानला जातो.

Tata Play

टाटा ग्रुपचे telecom enterprises cater ग्लोबल बिजनेस हाउसेसपासून ते कम्युनिकेशन आणि मनोरंजना संबंधित गरज पूर्ण करते. आम्ही तुम्हाला सांगतो की, TATA PLAY लिमिटेड, हे टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टीएफसीएफ कॉर्पोरेशन यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. टाटाचे इतर ॲप्स 1MG, क्रोमा आणि बिगबास्केट देखील लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत.

Also Read: RATAN TATA यांनी वर्षांपूर्वीच AI वर केला होता खुलासा! स्वस्तात फास्ट इंटरनेट देण्यासाठी BSNL सह देखील हातमिळवणी

इतकंच नाही तर, टेक उद्योगात टाटा समूहाचा चांगलाच दबदबा दिसून येत आहे, कारण टाटा भारतात iPhone ची निर्मिती करत आहे. Tata Electronics चा तामिळनाडूच्या होसूरमध्ये iPhone प्लांट आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये उत्पादन सुरू होईल, ज्यामध्ये 50,000 कर्मचारी काम करतील. Apple चा भारतातील हा चौथा प्लांट असून iPhone साठी टाटाचा दुसरा प्लांट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo