महिंद्राने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक कार eVerito लाँच केली आहे. ही कार ३ व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आली आहे, D2, D4 आणि D6. ह्या कारची किंमत ९.५० लाखांपासून १० लाखांपर्यंत पर्यंत आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार 110 किमीपर्यंतचा अंंतर पार करु शकते आणि ह्याचा टॉप स्पीड 86kmph आहे.
त्याशिवाय ह्या कारमध्ये 72V Lithuim-ion बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्या कारची रनिंग कॉस्ट 1.15/km आहे. ही कार नवी दिल्ली, मुंबई, बंगळूरू, पुणे, कोलकता, चंदीगड, हैदराबाद, जयपूर आणि नागपूरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा – झोलो वन HD रिव्ह्यू
ह्या कारमध्ये पुर्नयोजक ब्रेकिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ही टेक्नॉलॉजी ब्रेकिंगच्या दरम्यान निर्माण होणा-या एनर्जीला स्टोर करतो आणि त्याला मोटरपर्यंत पोहोचवतो. ज्यामुळे ही कार अजून थोडी दूर पर्यंत जाते. ह्यात एक REVIVE फीचरसुद्धा दिला गेला आहे, ज्यामुळे ही कार 8 किमी पेक्षा जास्त जाते.
त्याशिवाय ड्रायवरला महिन्याभरासाठी चार्जिंग पॅटर्न्स, डिस्टेंस ट्रॅवल, फ्यूल सेव आणि आणखी डाटा मिळतो. त्याचबरोबर ह्यात इंटेलिजेंट एनर्जी मॅनेजमेंट सिस्टम (IEMS) सुद्धा दिला गेला आहे. ह्या कारमध्ये D6 व्हर्जन फास्ट चार्जिंगसह येतो.
कंपनीचा दावा आहे की, ह्या टेक्नॉलॉजी अंतर्गत ही कार कंपनीच्या कोणत्याही इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग स्टेशनवर 0%-80% टक्क्यांपर्यंत केवळ १ तास 45 मिनिटांपर्यंत चार्ज होते.
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 एजमध्ये असू शकतो ड्यूल कॅमेरा सेटअप
हेदेखील वाचा – HP चा हा नोटबुक आहे आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका नोटबुक