Maharashtra Vidhansabha Election 2024: शेवटचा दिवस! निवडणुकीसाठी मतदान करायचंय? आजच करा नावनोंदणी, पहा कसे?
उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मतदान होईल.
जर अजूनही तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर, तुम्हाला जरा घाई करावी लागेल.
आज 19 ऑक्टोबर 2024 पर्यंतच पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी
Maharashtra Vidhansabha Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा 2024 निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहेत. कारण, उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मतदान होईल. सर्व नागरिकांना मतदानाचे कर्तव्य करून आपला नेता निडवण्याचे अधिकार आहे. मात्र, तुम्हाला माहितीच असेल की, यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे, आवश्यक आहे.
जर अजूनही तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर, तुम्हाला जरा घाई करावी लागेल. कारण आज 19 ऑक्टोबर 2024 पर्यंतच तुम्हाला मतदार यादीत तुमचे नाव समाविष्ट करण्याची संधी आहे. होय, ज्यांनी अजूनही आपले नाव मतदार यादीत नोंदवले नाही त्यांनी आजच हे काम उरकून घ्या.
मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली माहिती
“ज्या पात्र नागरिकांनी अजूनही मतदार यादीत आपले नाव नोंदवले नाही, त्यांनी आजच आपले नाव यादीत नोंदवून घ्यावे. यासह तुम्हाला तुमच्या मतदानाचे कर्तव्य सहज पार पडत येईल.”, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मतदारांना केले. आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो की, मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला आज रात्रीपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नाव नोंदणी करण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) October 16, 2024
बुधवार, दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील २८८ मतदारसंघात होणार मतदान
आजच मतदार यादीत आपले नाव तपासा आणि नसेल तर १९.१०.२०२४ पर्यत अर्ज क्र ६ भरा pic.twitter.com/44opS2t0Ff
- ज्या पात्र नागरिकांना नावनोंदणी करायची आहे. अशा नागरिकांकडून उमेदवाराचे नामनिर्देशपत्रे दाखल करण्याच्या अंतिम तारखेचा दहा दिवस अगोदर म्हणजेच आजपर्यंत मिळालेले अर्ज क्रमांक 6 मतदार यादीत नोंद घेण्याची विचारात घेतले जाणार आहेत.
- वरील संधीचा लाभ घेऊन सर्व मतदारांनी यादीत आपली नावनोंदणी करत, मतदानाचा हक्क बजावावे, असे मुख्य निवडणूक अधिकऱ्यांनी आवाहन केले.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile