जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सुरु केले ४ नवीन अॅनड्रॉईड अॅप्स…

जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सुरु केले ४ नवीन अॅनड्रॉईड अॅप्स…
HIGHLIGHTS

सार्वजनिक सुरक्षा अजून मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी हे अॅप्स सुरु केले आहेत.

दिवसेंदिवस वाढत जाणारे गुन्हेगारीचे प्रमाण, महिला सुरक्षा आणि सायबर क्राइम यांसारख्या प्रश्नावर तोडगा म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी ४ नवीन अॅप्स सुरु केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ह्या अॅप्सचे अनावरण करण्यात आले.

Pratisaad-Ask, Police-Mitra, vahanchoritakrar आणि Railway Helpline App अशी ह्या अॅप्सची नावे आहेत. हे अॅप्स म्हणजे आपली तक्रार आणि समस्या मांडण्याचा एक योग्य प्लेटफॉर्म असेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेदेखील वाचा – भारतात लवकरच होणार ह्या धमाकेदार बजेट स्मार्टफोन्सची एन्ट्री!!!

तसेच अॅप्सच्या मदतीने नागरिक आणि पोलिसांमधील वाढत चालले अंतर कमी होईल आणि लोक निर्धास्तपणे केव्हाही कधीही आपली तक्रार नोंदवू शकतात.
 

सध्यातरी हा अॅप केवळ अॅनड्रॉईड धारकांसाठी सुरु करण्यात आला असून लवकरच हा iOS वर देखील सुरु केला जाईल. असे महाराष्ट्र पोलिस संचालक प्रविण दिक्षित यांनी सांगितले.

हेदेखील वाचा – विंडोज 10 ने सुसज्ज आहे Notion Ink Able 10 टू-इन-वन लॅपटॉप
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स भारतात लाँच: 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo