Maharashtra Elections 2024: वोटर ID कार्ड हरवलं? ‘या’ पर्यायी कागदपत्रांद्वारे देखील करता येईल मतदान
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदार 20 नोव्हेंबर रोजी सज्ज
मतदान करण्यासाठी तुमच्याकडे वोटर ID कार्ड असणे आवश्यक आहे.
मतदार मतदान करण्यासाठी फोटो आयडेंटिटी EPIC व्यतिरिक्त 12 मान्यताप्राप्त ओळख पुराव्यांपैकी कोणतेही वापरू शकतात.
Maharashtra Elections 2024: अखेर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदार 20 नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की, मतदान करण्यासाठी तुमच्याकडे वोटर ID कार्ड असणे आवश्यक आहे. पण, ऐन मतदानाच्या दिवशी तुमचे वोटर आयडी हरवले तर काय? तुम्ही मतदान कसे करणार? काळजी करू नका. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला वोटर ID ऐवजी मतदानासाठी स्वीकारल्या जाणाऱ्या कागदपत्रांबद्दल माहिती देणार आहोत.
मतदार मतदानासाठी तयार होताना मतदान केंद्रावर आवश्यक कागदपत्रे नेणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे देखील तपासून घ्यावे. जे मतदार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाइन केले जाऊ शकते. Maharashtra Election 2024: ‘अशा’प्रकारे ऑनलाईन पद्धतीने मतदार स्लिप डाउनलोड करा, जाणून घ्या सोप्या स्टेप्स
मतदानासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर त्यांचे मतदार ओळखपत्र (Voter ID), मतदार माहिती (Voter Slip) स्लिप आणि फोटो ID प्रूफ सोबत ठेवणे, आवश्यक आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले होते की, मतदार मतदान करण्यासाठी फोटो आयडेंटिटी EPIC व्यतिरिक्त 12 मान्यताप्राप्त ओळख पुराव्यांपैकी कोणतेही वापरू शकतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, एप्रिलमध्ये ECI ने लोकसभा निवडणुकीसाठी अशीच घोषणा केली होती.
मतदान केंद्रावर स्वीकारलेल्या कागदपत्रांची यादी
- ड्रायविंग लायसेन्स
- पासपोर्ट
- फोटोसह सर्व्हिस आयडेंटिटी कार्ड (कर्मचाऱ्यांना केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कंपन्यांद्वारे जारी केलेले.)
- अधिकृत ओळखपत्रे (खासदार/आमदार/एमएलसी यांना जारी केलेले.)
- फोटोसह पासबुक (बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेले)
Checked your name on the electoral roll? ✅
— Election Commission of India (@ECISVEEP) November 19, 2024
Just bring any of these alternative documents and make your vote count.
You’re all set!#EarnYourSay #ReadyToVote #VoiceYourChoice #Election2024 #JharkhandElections #MaharashtraElections pic.twitter.com/7FIBZ350ae
- PAN कार्ड
- स्मार्ट कार्ड (NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले)
- मनरेगा जॉब कार्ड हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड (कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले.)
- युनिक डिसॅबिलिटी ID (UDID) कार्ड (सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे जारी केलेले.)
- भारत सरकारचे पेन्शन दस्तऐवज फोटोसह
- आधार कार्ड
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile