Maharashtra Election Result 2024: ECI वेबसाइटवरून थेट मतमोजणी कशी तपासावी? पहा सोपी प्रक्रिया
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी मतदान झाले.
अधिकृत ECI वेबसाइटवर थेट मतमोजणीच्या निकालांसह अपडेट ठेवता येईल.
ECI वेबसाइटवर थेट मतमोजणी कशी तपासावी? पहा प्रक्रिया
Maharashtra Election Result 2024: आपणा सर्वांना माहितीच आहे की, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी मतदान झाल्यामुळे आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. अखेर आज 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकालाचा दिवस देखील उजाडला आहे. त्यामळे, सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, एक्झिट पोलने महायुती आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यात तीव्र स्पर्धेचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरू केल्याने कोणीही त्यांना अधिकृत ECI वेबसाइटवर थेट मतमोजणीच्या निकालांसह अपडेट ठेवू शकतो.
Also Read: नवा TECNO POP 9 भारतात उत्तम फीचर्ससह लाँच! किंमत 7 हजारांपेक्षा कमी, पहा टॉप 5 फीचर्स
ECI वेबसाइटवर थेट मतमोजणी कशी तपासावी:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 च्या निकालांच्या थेट मतमोजणीसाठी खालील चरणांचे अनुसरण करून भारतीय निवडणूक आयोग (ECI) ची अधिकृत वेबसाइट तपासू शकता. पहा स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया:
- https://www.eci.gov.in/ येथे ECI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा https://results.eci.gov.in/ येथे रिजल्ट पेजवर जा, जे तुम्हाला लाईव्ह रिजल्ट पेजवर नेव्हिगेट करेल.
- एखाद्याने अधिकृत होमपेजवर क्लिक केल्यास, निवडणूक व्यवस्थापन म्हणजेच ‘Election Management’ शीर्षक असलेल्या विभागावर क्लिक करा. त्यानंतर निवडणूक निकाल 2024 च्या संबंधित लिंकवर क्लिक करा.
- आता तुम्हाला सरळ महाराष्ट्र आणि झारखंड इलेक्शन रिजल्ट पृष्ठावर नेले जाईल.
- आघाडीच्या आणि विजयी उमेदवारांसह तपशीलवार निकाल पाहण्यासाठी कोणत्याही मतदारसंघाच्या नावावर क्लिक करा.
- पक्षनिहाय कामगिरी तपासण्यासाठी, कोणीही “Party-wise Results” पर्याय निवडू शकतो.
तसेच, भौगोलिकदृष्ट्या निकाल पाहण्यासाठी कोणीही ‘स्टेट मॅप’ फिचरचा वापर करू शकतो. अशाप्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईनरित्या निवडणुकांचे निकाल पाहू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile